आयपीएल 2025 पूर्वी मेगा लिलावाचं आयोजन होणार आहे. त्याआधी सर्व संघांना त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची माहिती द्यावी लागेल. अशा स्थितीत अनेक संघांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आगामी काळात अशा अनेक मोठ्या खेळाडूंची नावं समोर येऊ शकतात, ज्यांना त्यांच्या संघांनी रिटेन केलं नाही. या बातमीत आम्ही तुम्हाला अशाच 3 खेळाडूंबद्दल सांगणार आहोत.
(3) ईशान किशन – मुंबई इंडियन्सचा सलामीवीर ईशान किशनला रिटेन करणं फ्रँचायझीसाठी मोठं अडचणीचं ठरू शकतं. आयपीएल 2024 मध्ये ईशाननं 14 सामन्यांत 22.85 च्या सरासरीनं 320 धावा केल्या होत्या. गेल्या काही काळापासून त्याच्या कामगिरीत सातत्य राहिलेलं नाही. अशा स्थितीत त्याला रिटेन करणं धोक्याचं ठरेल.
(2) मोहम्मद शमी – गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला दुखापतीमुळे आयपीएलच्या गेल्या मोसमातून बाहेर व्हावं लागलं होतं. शमी 2023 विश्वचषकापासून मैदानाबाहेर आहे. अशा स्थितीत त्याचा फिटनेस लक्षात घेऊन त्याला रिटेन करणं गुजरात टायटन्सला महागात पडू शकतं.
(1) केएल राहुल – लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलबद्दल विविध बातम्या येत आहेत. लखनऊ त्याला रिटेन करणार नाही, अशी चर्चा आहे. एक खेळाडू म्हणून चमकदार कामगिरी करूनही, राहुलच्या नेतृत्वाखाली लखनऊ सुपर जायंट्स अद्याप विजेतेपद पटकावू शकला नाही. याशिवाय राहुल जवळपास दोन वर्षांपासून भारताच्या टी20 संघाबाहेर आहे. अशा परिस्थितीत राहुलला मोठी किंमत मोजून रिटेन करणं धोक्याचं ठरू शकते. या कारणास्तव फ्रँचायझी खूप विचारपूर्वक निर्णय घेऊ शकते.
हेही वाचा –
दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूनं उडवली सूर्यकुमार यादवच्या कॅचची खिल्ली; म्हणाला, “जर वर्ल्ड कप फायनलमध्ये….”
चाहत्यांसाठी वाईट काळ, एका आठवड्यात तब्बल 5 खेळाडूंचा क्रिकेटला अलविदा!
विकेट घेतल्यानंतर जमिनीवर लोळायला लागली, महिला खेळाडूचं हे कसलं अनोखं सेलिब्रेशन!