न्यूझीलंड क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज केन विलियम्सन याने आपल्या फिटनेसविषयी महत्वाची माहिती दिली आहे. आगामी वनडे विश्वचषक ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात आयोजित केला गेला आहे. अशात विलियम्सनची दुखापत न्यूझीलंड संघासाठी चिंतेची बाब ठरत आहे. असे असले तरी विश्वचषकात विलियम्सन खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वतः विलियम्सनने याविषयी खास प्रतिक्रिया दिली.
इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) मध्ये केन विलियम्सन (Kane Williamson) गुजरात टायटन्स (Hardik Pandya) संघाचा भाग होता. हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातील संघाने हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळला. या पहिल्याच सामन्या विलियम्सन सीमारेषेजवळ झेल पकडताना दुखापतग्रस्त झाला. विलियम्सनची दुखापत गंभीर असल्यामुळे त्याला दीर्घ काळ संघातून बाहेर रहावे लागले. अजूनही तो पूर्णपणे फिट झाला नाहीये. अशात आगामी वनडे विश्वचषकात विलियम्सन खेळणार, याबाबत देखील खात्री देता येत नाही. स्वतः विलियम्सनला देखील याबाबत शास्वती देता आली नाहीये.
माध्यमांतील वृत्तांनुसार आपली फिटनेसविषयी केन विलियम्सन नुकताच एका मुलाखतीत व्यक्त झाला. तो म्हणाला, “वेळेत फिट होण्यासाठी काय करता येईल, याकडे मी लक्ष देत आहे. चांगले वाईट दिवस येत असताता, हा खेळाचा भाग आहे. खूप लांबचा विचार करणे सध्या कठीण आहे, कारण काही गोष्टी अगदी योग्य सुरू आहेत. पण अजूनही खूप काम करायचे आहे, हे मला माहीत आहे. मी सध्या फक्त वर्तमानाचा विचार करत आहे आणि दुखापतीतून सावरण्यासाठी पूर्ण मेहनत घेत आहे.”
दरम्यान, आयपीएल 2023 दरम्यान दुखापत झाल्यामुळे विलियम्सन दरम्यानच्या काळात काही महत्वाच्या मालिकांना मुकला आहे. त्याने दुखापतीनंतर दोन्ही गुडघ्यांची शस्त्रक्रिया केली असून अद्याप मैदानात पुनरागमन करू शकला नाहीये. असे असले तरी, काही दिवसांपूर्वीच त्याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये विलियम्सन फलंदाजी करताना दिसत होता आणि त्याच्या बॅटमधून काही अप्रतिम शॉट्स देखील पाहायला मिलाले. येत्या काही दिवसांमध्ये न्यूझीलंडच्या या दिग्गज फलंदाजाबाबत महत्वाची माहिती मिळू शकते. वनडे विश्वचषकात विलियम्सन खेळला, तर न्यूझीलंडसाठी ही जमेची बाजू ठरू शकते. (Big reaction of the injured Kane Williamson! Know whether to play in the World Cup or not?)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING: बांगलादेशला मिळाला नवा कर्णधार! ‘हा’ धुरंधर वाहणार आशिया कप आणि वर्ल्डकपमध्ये धुरा
फॉर्ममध्ये परतताच पृथ्वी शॉचा संघ निवडकर्त्यांवर निशाणा; म्हणाला, ‘मी विचारही करत नाही…’