---Advertisement---

IPL2026: केकेआर चाहत्यांसाठी मोठी अपडेट समोर! हर्षित राणाच्या रिप्लेसमेंटबाबत KKR चा मोठा निर्णय

On: मंगळवार, मार्च 17, 2026 10:27 PM
---Advertisement---

आयपीएल 2026 सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 28 मार्चपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात गतविजेता संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद (RCB vs SRH) आमनेसामने असतील. दरम्यान, हंगाम सुरू होण्यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज हर्षित राणा (Harshit Rana) दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडल्याची चर्चा होती.

टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना हर्षितच्या गुडघ्याला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याला शस्त्रक्रिया करावी लागली आणि तो वर्ल्ड कपमधूनही बाहेर झाला. अशा परिस्थितीत चाहते हर्षितच्या जागी कोण येणार याची वाट पाहत होते, पण केकेआरने अद्याप कोणाचीही घोषणा केलेली नाही.

दरम्यान, आता एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे की, केकेआरने हर्षितच्या रिप्लेसमेंटची (पर्यायी खेळाडू) घोषणा न करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच फ्रँचायझी त्याच्या जागी दुसरा खेळाडू आणणार नाही. रिपोर्टनुसार, हर्षित राणा पूर्ण हंगाम खेळण्यास मुकणार नाही. हर्षितच्या प्रकृतीत सुधारणा होत असून तो आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकतो. केकेआरला आशा आहे की, हर्षित हंगाम दरम्यान कधीही फिट होऊन संघात सामील होऊ शकतो. फ्रँचायझीने त्याला 4 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---