मागच्या मोठ्या काळापासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि पाकिस्कान क्रिकेट बोल्ड आशिया चषकाच्या मुद्यावरून आमने सामने आहे. यावर्षीची होणाऱ्या आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण बीसीसीआय मात्र आशिया चषकासाठी पाकिस्तान दौरा करू इच्छित नाही. याच पार्श्वभूमीवर मागच्या काही महिन्यात दोन्ही क्रिकेट बोर्ड अनेकदा आमने सामने आले आहेत. आता पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी भारताने आशिया चषकावर बहिष्कार टाकल्यानंतर पीसीबीला होणाऱ्या नुकसानाची माहिती दिली.
नजम सेठी (Najam Sethi) यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघाने आशिया चषक 2023 वर बहिष्कार टाकला, तर पीसीबीला तब्बल 30 लाख मिलियन डॉलर्सचे नुकसान होईल. पण असे झाले, तरीदेखील पीसीबी हे नुकसान झेलण्यासाठी सक्षम असल्याचेही सेठींनी यावेळई सांगितले. पीसीबीने मागच्या काही वर्षांमध्ये पाकिस्तान सुपर लीगच्या माध्यमातून मुबलक पैसा कमावला आहे. अशात आशिया चषकाचे नुकसान देखील पीसीबी सहन करू शकतो.
दरम्यान काही दिवसांपूर्वी बीसीसीआय आणि पीसीबीच्या उपस्थितीत आशिया क्रिकेट परिषदेने बैठक बोलावली होती. या बैठकीत बीसीसीआयने पाकिस्तानचा दौरा करण्यास स्पष्ट नकार दिला होता. पुढे अशीही माहिती समोर आली की, आशिया चषक पाकिस्तानमध्ये होईल, पण भारताचे सर्व सामने पाकिस्तानबाहेर आयोजित केले जातील. याविषयी नजम सेठी म्हणाले, “जर आशिया चषक हायब्रिड पद्धतीने (भारताचे सामने पाकिस्तानबाहेर आणि उर्वरीत सामने पाकिस्तानमध्ये) झाला नाही, तर आम्ही दुसरे कोणतेच वेळापत्रक स्वीकारणार नाही. पीसीबी आशिया चषकात खेळणार देखील नाही.”
सेठी पुढे असेही म्हणाले की, “भारतीय संघासाठी सुरक्षेची काहीच अडचण नाहीये. सरकार जर पाकिस्तानमध्ये खेळण्याची परवानगी देत नसेल, तर आम्हाला याचा लेखी पुरावा दाखवा, असेही आम्ही म्हणालो. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडसह इतर सर्व संघ पाकिस्तानात खेळण्यासाठी तयार आहेत, तर भारतालाही याठिकाणी यायला काहीच अडचण नाहीये.”
दरम्यान, यावर्षी सप्टेंबर महिन्यात होणारा आशिया चषक पाकिस्तानमध्ये होणार की नाही, हे लवकरच समजू शकते. दुसरीकडे आशिया चषकाच्या आधीत ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतीय संघाला वनडे विश्वचषकाचे यजमानपद भूषवायचे आहे. आशिया चषकासाठी भारत पाकिस्तानमध्ये येणार नसेल, तर पाकिस्तान देखील वनडे विश्वचषकासाठी भारतात जाणार नाही, अशी प्रतिक्रिया पीसीबीकडून यापूर्वी आली आहे. येत्या काळात या मुद्यावर दोन्ही क्रिकेट बोर्ड एकमताने निर्णय घेतील, अशी आशा चाहत्यांना आहे. (Big Statement by PCB Chief Najam Sethi about Asia Cup 2023 )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: विजयानंतर आवेशने केले अशोभनीय वर्तन! मात्र, या कारणाने टळली कारवाई
मी चांगलाच खेळलो! वाचा 20 चेंडूत 18 धावा करणारा केएल राहुलचे काय म्हणाला






