---Advertisement---

पुन्हा टीम इंडियाच्या जर्सीत खेळण्यासाठी ‘हा’ खेळाडू उत्सुक, वेळ दिल्याने बीसीसीआयलाही म्हटले थँक्यू

Hardik-Pandya
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२२(आयपीएल) संपले असून आता भारताच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामने पाहायला मिळणार आहेत. ९ जून पासून दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. यातील पहिला सामना दिल्लीच्या अरूण जेठली स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेत आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी दिली आहे.

आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाला पदार्पणातच विजेतेपद जिंकून देणाऱ्या हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) या मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन केले आहे. गुजरात संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हार्दिकचा व्हिडीओ शेयर केला आहे. त्यात हार्दिकने संघात संधी दिल्याने बीसीसीआयचे (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) आभार मानले आहे.

“खूप लोकांना माहित नसेल की संघाबाहेर जाण्याचा निर्णय हा माझा स्वत:चा होता. मला कोणीही संघाबाहेर काढले नव्हते. बीसीसीआयने मला वेळ दिला आणि संघामध्ये लवकर येण्यासाठी परावृत केले नाही. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, “असे हार्दिकने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

हार्दिक २०२१च्या टी२० विश्वचषकानंतर थेट आयपीएलमध्येच दिसला. पंधराव्या आयपीएल हंगामात अष्टपैलू कामगिरी करत त्याने संघनिवड अधिकाऱ्यांना त्याला संघात घेण्यासाठी विचार करायला लावला. तो यंदाच्या आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर राहिला. त्याने १५ सामन्यात ४४.२७च्या सरासरीने ४८७ धावा केल्या आहेत. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट १३१.२७ एवढा राहिला. तसेच त्याने आठ विकेट्सही घेतल्या आहेत.

अंतिम सामन्यात हार्दिकने ३४ धावा आणि तीन विकेट्स घेत संघाच्या विजयात महत्वाची भुमिका पार पाडली. आयपीएलमध्ये गोलंदाजी केल्याने त्याची संघात निवड करणे सोपे झाले. दुखापतीमुळे २०२१च्या टी२० विश्वचषकामध्ये त्याला गोलंदाजी करण्यास त्रास होत होता.

आयपीएल २०१५ च्या हंगामात पदार्पण करणाऱ्या हार्दिकने आतापर्यंत पाच आयपीएल अंतिम सामने खेळले आहेत. या सगळ्या सामन्यात त्याचा संघ विजयी होत त्याने अनोखा पराक्रम नावे केला आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने चार विजेतेपद पटकावली आहेत. हार्दिक बरोबरच दिनेश कार्तिकनेही भारतीय संघात पुनरागमन केले आहे. त्याने २०१९च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर संघात स्थान मिळवले आहे.

महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

अगग! २२ वर्षीय गोलंदाजाच्या रणनितीपुढे अनुभवी विलियम्सनने टेकले गुडघे, स्टोक्सलाही हसू अनावर

इकडे दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू घेतायत मेहनत, तर दुसरीकडे भारतीय कर्णधार परदेशात करतोय मजा, Video Viral

भाजप नेत्याचा मोठा आरोप; म्हणाले, ‘IPL निकालात मोठी गडबड, समिती नेमली पाहिजे’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---