जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) सोळावा हंगाम सुरू होण्यासाठी अद्याप सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे. मात्र, आतापासूनच आयपीएलच्या या नव्या पर्वाची तयारी सुरू झाल्याचे दिसतेय. सर्व संघ आपाआपली संघबांधणी करण्यात गुंतले आहेत. आयपीएल 2023 ची ट्रेडिंग विंडो देखील सुरू झाली असून रवींद्र जडेजाच्या ट्रेडबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येतेय.
मागील दहा वर्षांपासून चेन्नई सुपर किंग्सचा अविभाज्य घटक असलेला अष्टपैलू रवींद्र जडेजा मागील वर्षी हंगामाच्या सुरुवातीला संघाचा कर्णधार होता. मात्र, त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईला साजेशी कामगिरी करता आली नाही. तसेच त्याने दुखापतीमुळे शेवटच्या काही सामन्यांमधून माघार घेतली. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स आणि रवींद्र जडेजा यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याच्या बातम्या समोर येत होत्या. जडेजाने चेन्नईबाबतच्या आपल्या सर्व इंस्टाग्राम पोस्ट हटवल्यानंतर या चर्चेला जोर आला होता. तसेच जडेजा चेन्नई सुपर किंग्स सोडून इतर संघात दिसणार याबाबत अनेक माध्यमांनी बातमी चालवली होती.
एका प्रसिद्ध क्रिकेट संकेतस्थळाच्या बातमीनुसार, नुकतेच रवींद्र जडेजा याला ट्रेड करण्याबाबत मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स यांनी चेन्नई सुपर किंग्सला विचारणा केली होती. मात्र, चेन्नईने त्यांच्या या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली आहे. तसेच शुबमन गिल व रवींद्र जडेजा यांच्यातील ट्रेडही होणार नसल्याचे खात्रीशीर वृत्त समोर येतेय. चेन्नई सुपर किंग्सने, जडेजा हा जागतिक दर्जाचा खेळाडू असल्याचे म्हणत तो पुढील हंगामातही संघासोबत असेल याचे संकेत दिले आहेत.
आयपीएलची पहिली ट्रेडिंग विंडो लिलावाच्या एक आठवडाभर आधीपर्यंत सुरू राहील. लिलावानंतरही खेळाडू ट्रेड होऊ शकतात.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सचिन नावाचे वादळ धडकले इंग्लंडला, 24 वर्षानंतर तेंडूलकरच्या ‘त्या’ शॉटने चाहत्यांना झाली शारजाहची आठवण
झिम्बाब्वेला क्रिकेटमध्ये मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या ऍलिस्टर कॅम्पबेलची कारकिर्द एक अध्याय ठरली
जेव्हा १५ वर्षांपुर्वी टीम इंडियाच्या युवराजने केले होते ‘ऑस्ट्रेलिया’ संस्थान खालसा





