पुणे, 28 नोव्हेंबर 2022: पुनित बालन आणि केदार जाधव क्रिकेट अकादमी यांच्या तर्फे आयोजित पहिल्या पुनित बालन- केदार जाधव मेगा क्लब 19 वर्षाखालील चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत पीवायसी हिंदू जिमखाना संघाने आपल्या कामगिरीत सातत्य राखत जस क्रिकेट अकादमी संघाचा पराभव करत स्पर्धेत सलग दुसरा विजय संपादन केला.
पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात साखळी फेरीत सोहम शिंदेच्या सातत्यपूर्ण खेळाच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने स्पार्क संघाचा 223 धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 47 षटकात 8 बाद 298 धावांचा डोंगर रचला. सोहम शिंदेने दमदार फलंदाजी करत 82 चेंडूत 12 चौकार व एका षटकारासह 94 धावा करत संघाचा डाव भक्कम केला. यात स्वप्नील शिंदेने 60 व साईराज चोरगेने 45 धावा करून सोहमला सुरेख साथ दिली. 298 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वरुण चौधरी, स्वराज चव्हाण, कूष पाटील व आर्या पानसे यांच्या अचूक गोलंदाजीपुढे स्पार्क संघ केवळ 24 षटकांत सर्वबाद 75 धावांत गारद झाला. सोहम शिंदे सामनावीर ठरला.
डिझायर स्पोर्ट्स कॉर्पोरेशन क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात समर्थ वाबळेच्या अचूक गोलंदाजीच्या बळावर जस क्रिकेट अकादमी संघाने सहारा संघाचा सर्व 10 गडी राखून पराभव केला. समर्थ वाबळेने सहारा संघला 30 षटकांत सर्वबाद 81 धावांत रोखले. समर्थने 41 धावात 5 गडी बाद केले. 81 धावांचे लक्ष जस क्रिकेट अकादमी संघाने एकही गडी न गमावता 11.1 षटकांत 84 धावांसह पुर्ण केले. यात मनलीव घईने नाबाद 40 तर शिव हरपळेने नाबाद 25 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. समर्थ वाबळे सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
पीवायसी हिंदू जिमखाना : 47 षटकात 8 बाद 298 धावा (सोहम शिंदे 94(82,12×4,1×6), स्वप्नील शिंदे 60(53,7×4), साईराज चोरगे 45(52,8×4), अंजनेय पुराणिक 29(35,4×4), करण उपाध्याय 3-47, अद्वैत वामन 2-61, विघ्नेश काटे 2-66) वि.वि स्पार्क: 24 षटकांत सर्वबाद 75 धावा (अद्वैत वामन 24(43,3×4), वरुण चौधरी 4-7, स्वराज चव्हाण 2-13, कूष पाटील 2-20, आर्या पानसे 2-25) सामनावीर- सोहम शिंदे
पीवायसी हिंदू जिमखाना 223 धावांनी विजयी
सहारा: 30 षटकांत सर्वबाद 81 धावा(राज 27(40,3×4), पुष्कर अहिरराव 17(18, 4×4), समर्थ वाबळे 5-41, निमीर जोशी 2-9, तनिश बागणे 1-1) पराभव वि जस क्रिकेट अकादमी : 11.1 षटकांत 0 बाद 84 धावा(मनलीव घई नाबाद 40(41,4×4,3×6), शिव हरपळे नाबाद 25(29,4×4)) सामनावीर- समर्थ वाबळे
जस क्रिकेट अकादमी 10 गडी राखून विजयी (Big win for PYC Hindu Gymkhana and Jas Cricket Academy teams)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिल्या पुनित बालन-केदार जाधव मेगा क्लब चॅम्पियनशिप 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना, डेक्कन जिमखाना संघांचा विजय
ऋतुराजप्रमाणेच ‘या’ भारतीय दिग्गजाने एका षटकात मारलेत सात चौकार, नाव ऐकून व्हाल हैराण






