इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL 2024) च्या पहिल्या सीजनला बुधवार (6 मार्च) पासून सुरुवात झाली. पहिला सामना सचिन तेंडुलकरची टीम ‘मास्टर्स इलेव्हन’ आणि अक्षर कुमारची टीम ‘खिलाडी इलेव्हन’ यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मास्टर्स इलेव्हननं 5 धावांनी विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना सचिनच्या संघानं 10 षटकांत 7 गडी गमावून 94 धावा केल्या. सचिन तेंडुलकरनं 17 चेंडूत 30 धावांची स्फोटक खेळी केली. सचिननं त्याच्या खेळीदरम्यान अक्षय कुमारच्या एका चेंडूवर गगनचुंबी षटकारही ठोकला. मात्र ही मॅच आठवणीत राहिली ती सचिनच्या विकेटमुळे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, ‘क्रिकेटचा देव’ म्हटल्या जाणाऱ्या सचिनची विकेट चक्क बिग बॉस विजेता मुनवर फारुकीनं घेतली!
सचिनची विकेट घेतल्यानंतर मुनवर फारुकीनं आनंद व्यक्त केला आणि अख्या स्टेडियममध्ये शांतता पसरली. मुनवरचा त्यानं सचिनला बाद केलं यावर विश्वासच बसत नव्हता. त्याचवेळी बाद होताच सचिनही हसत हसत पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यात मास्टर्स इलेव्हनसाठी सचिन व्यतिरिक्त युसूफ पठाणनंही शानदार खेळी खेळली. त्यानं 10 चेंडूत 21 धावा ठोकल्या.
.@ispl_t10 is poised to amaze us all, much like Munawar did by dismissing the 𝐌𝐚𝐬𝐭𝐞𝐫 𝐁𝐥𝐚𝐬𝐭𝐞𝐫 👀 🤯 #SonySportsNetwork #ispl #isplt10 #Street2Stadium #ZindagiBadalLo pic.twitter.com/801LO25ilh
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) March 6, 2024
सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, लक्ष्याचा पाठलाग करताना खिलाडी इलेव्हनला 10 षटकांत 6 गडी गमावून केवळ 89 धावा करता आल्या. खिलाडी इलेव्हनकडून मुनवर फारुकीनं 26 चेंडूत 26 धावांची खेळी केली. तर इरफान पठाणनं 8 चेंडूत नाबाद 32 धावा केल्या. मात्र, इरफानची ही स्फोटक खेळी त्याच्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकली नाही. मास्टर्स इलेव्हन 5 धावांनी विजयी झाली.
सचिन तेंडुलकर हा ISPL 2024 लीगचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे, लीगमध्ये 6 संघ सहभागी असून भारतीय चित्रपटसृष्टीतील बडे स्टार्स त्यांचे मालक आहेत. ही स्पर्धा 6 मार्च ते 15 मार्च दरम्यान खेळली जाणार आहे. ISPL 2024 च्या उद्घाटन सोहळ्यात रंगारंग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सचिननं राम चरण आणि अक्षय कुमारसोबत नाटू-नाटू गाण्यावर डान्सही केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: श्रीलंका-बांगलादेश मॅचमध्ये पुन्हा राडा! बॅटला चेंडू लागूनही तिसऱ्या अंपायरनं दिलं नॉट आऊट
धरमशाला कसोटीत युवा फलंदाजाचं पदार्पण, 24 वर्ष जुना विक्रम मोडला
BCCI च्या करारातून श्रेयस-इशानला वगळल्यानंतर रोहितची पहिली प्रतिक्रिया, सक्त ताकीद देत म्हणाला…