बुधवारपासून (दि. 14 जून) सुरू झालेला बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान संघातील एकमेव कसोटी सामना 17 जून रोजी निकाली लागला. ढाका स्टेडिअममध्ये पार पडलेल्या या सामन्यात अफगाणिस्तान संघाने नांग्या टाकल्या. हा सामना बांगलादेश संघाने जिंकत खास मोठा इतिहास रचला. अशी कामगिरी करणारा बांगलादेश संघ केवळ तिसराच संघ ठरला. चला तर, बांगलादेश संघाने केलेल्या खास विक्रमाविषयी जाणून घेऊयात…
बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान (Bangladesh vs Afghanistan) संघातील या कसोटी सामन्याचा निकाल चौथ्या दिवशी लागला. बांगलादेशने अफगाणिस्तानवर 546 धावांनी विजय मिळवला. या विजयासह बांगलादेशने कसोटी क्रिकेटचे विक्रमही उद्ध्वस्त केले. यजमान संघांने कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला. बांगलादेश कसोटीत धावांनुसार तिसरा मोठा विजय मिळवण्यात यशस्वी झाला. यासोबतच मागील 90 वर्षांमध्ये कोणत्याही संघाने मिळवलेला हा सर्वात मोठा विजयदेखील आहे.
कसोटीतील सर्वात मोठा विजय
सन 1928मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात ब्रिस्बेन येथे कसोटी सामना पार पडला होता. त्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने 675 धावांनी सर्वात मोठा विजय मिळवला. यानंतर कसोटीतील दुसरा सर्वात मोठा विजय 1934 मध्ये द ओव्हल मैदानात मिळवला गेला. हा विजयही ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच मिळवला. यावेळी ऑस्ट्रेलियाने 562 धावांनी विजय मिळवला होता. यानंतर आता 546 धावांच्या विजयासह बांगलादेशही सर्वात मोठा विजय मिळवणारा तिसरा संघ ठरला.
कसोटीतील सर्वात मोठा विजय (धावांनुसार)
675- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, (ब्रिस्बेन-1928)
562- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, (द ओव्हल- 1934)
546- बांगलागेश विरुद्ध अफगाणिस्तान, (मीरपूर- 2023)
Walton Test Match: Bangladesh vs Afghanistan | Only Test | Day 04
Bangladesh won by 546 runs.
Full Match Details: https://t.co/MDvtIwN35K#BCB | #Cricket | #BANvAFG pic.twitter.com/sk24j4tteZ
— Bangladesh Cricket (@BCBtigers) June 17, 2023
बांगलादेशचे जबरदस्त प्रदर्शन
बांगलादेश संघाने या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या डावात नजमुल हुसेन शांतो याच्या 146 धावांच्या जोरावर 382 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा पहिला डाव 146 धावांवर संपुष्टात आला. यानंतर बांगलादेशने दुसरा डाव 4 बाद 425 धावांवर घोषित केला. यावेळी बांगलादेशकडून शांतोने 124 आणि मोमिनुल हक याने नाबाद 121 धावा चोपल्या होत्या. अशाप्रकारे बांगलादेशने अफगाणिस्तानला विजयासाठी 662 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघाचा दुसरा डाव 115 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे बांगलादेश संघाने 546 धावांनी दणदणीत विजय मिळवला. (Biggest wins in Test Cricket history bangladesh create record)
महत्वाच्या बातम्या-
सुरेश रैनाचा मोठा गौप्यस्फोट! म्हणाला, ‘त्याला खेळवण्यापूर्वी धोनीने माझी परवानगी…’
शतक एक, विक्रम अनेक! रूटने सेंच्युरी ठोकताच मोडला डॉन ब्रॅडमन यांचा मोठा Record, एकदा वाचाच