इंग्लंडमध्ये ‘द हंड्रेड क्रिकेट लीग’ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत खूप रोमांचक सामने होत आहे. नुकताच बर्मिंघम फिनिक्स आणि ओवल इन्विंसिबल यांच्यातही बुधवारी (4 ऑगस्ट) रंगतदार सामना पाहायला मिळाला. ओवल इन्विंसिबलने तुफान फटकेबाजी करत निर्धारित शंभर चेंडूत 172 धावा केल्या, तरी बर्मिंघम फिनिक्सने रोमांचकरित्या सामन्यात विजय मिळवला.
ओवल इन्विंसिबलकडून खेळताना दक्षिण आफ्रिकेचा 36 वर्षीय फलंदाज कोलिन इंग्रामने अतिशय जबरदस्त फलंदाजी करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. इंग्राम 43 चेंडूंचा सामना करत 81 धावा कूटल्या. यात 8 चौकार तर 4 गणनचुंबी षटकारांचा समावेश होता. त्याच्या खेळीच वैशिष्ट्य म्हणजे त्याने सगळया गोलंदाजांना फोडून काढले आणि शेवटपर्यंत नाबाद राहिला.
‘द हंड्रेड क्रिकेट लीग’ स्पर्धेच्या सुरुवातीच्या तीन सामन्यात तो प्रभावी फलंदाजी करू शकला नाही. म्हणून त्याला ‘प्लेइंग इलेवनमध्ये’ न खेळवण्याची चर्चा होत होती. परंतु, आता त्याने टीकाकारांना योग्य उत्तर देत तोंड बंद केलं असले तरी त्याच्या संघाला विजय मिळवता आला नाही.
मोईन अलीने बर्मिंघम फिनिक्सकडून खेळताना जशास तसे उत्तर देत 49 धावांची धमाकेदार खेळी केली. त्याने 26 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकार लगावत संघाला विजयाच्या समीप नेले. विल स्मिड 45 आणि फिन अलण 23 यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. क्रिस बेंजामिन ने 16 चेंडूत नाबाद 37 करत संघाला विजयश्री मिळवून दिली. हा या स्पर्धेतील 18 वा सामना होता.
महत्त्वाच्या बातम्या –
‘ऑलिम्पिक २०२४ मध्ये क्रिकेटचाही समावेश करा’, इंग्लंड-भारत कसोटीदरम्यान प्रेक्षकाने केली मागणी
भाड्याने जमीन घेऊन शेती करणाऱ्या कुटुंबातील पोरानं भारताला जिंकून दिलं ‘रौप्य’ पदक
“मी विश्वासाने सांगू शकत नाही की विराट आयसीसी ट्रॉफी जिंकेल की नाही”