---Advertisement---

वाढदिवस विशेष- गॅरी सोबर्सबद्दल कधीही न ऐकलेल्या १० गोष्टी

---Advertisement---

महान अष्टपैलू खेळाडू गॅरी सोबर्स आज (२८ जुलै) आपला ८६वा वाढदिवस साजरा करत आहेत. विंडीजच्या या महान खेळाडूने १९५४ ते १९७४ या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. ९३ कसोटी सामन्यात ८०३२ धावा आणि २३५ विकेट्स घेण्याचा पराक्रम त्यांनी केला आहे.

त्यांच्याबद्दल या काही मनोरंजक गोष्टी- 

१. गॅरी सोबर्स यांना ५ भावंडे होती. जहाज फुटल्यामुळे त्यांच्या वडीलांचे सोबर्स ५ वर्षांचे असतानाच निधन झाले होते.

२. ते लहान असताना क्रिकेट, फूटबाॅल आणि बास्केटबाॅल खेळत असत. हे तीनही खेळ खेळण्यासाठी लागणारी नैसर्गिक प्रतिभा त्यांच्याकडे होती.

३. वयाच्या १५व्या वर्षीच ते १९५१-५२ला प्रथम श्रेणीचे सामने खेळले आहेत. त्याच्यातील प्रतिभा वाईल्डफ्रेड फ्रमर यांनी हेरली आणि बार्बोडसमधील पोलीस संघात त्यांना स्थान दिले.

४. त्यांना १९५३मध्ये बार्बोडस संघाकडून भारताविरुद्ध प्रथम सराव सामना खेळण्याची संधी मिळाली. त्यात त्यांनी ७ विकेट्स घेत जबरदस्त कामगिरी केली होती.

https://twitter.com/ICC/status/890768782121193473

५. सोबर्स यांनी पहिले कसोटी शतक सबीना पार्कवर केले. त्यांनी पहिल्याच शतकात नाबाद ३६५ धावा केल्या. पहिलेच शतक त्रिशतक करणारे ते जगातील पहिले खेळाडू आहेत.

https://twitter.com/ICC/status/969195561231552513

६. कसोटीत त्रिशतक करणारे ते सर्वात तरुण खेळाडू होते आणि आजही हा विक्रम त्यांच्याच नावावर आहे. तेव्हा ते केवळ २१ वर्ष आणि २१३ दिवसांचे होते.

७. कसोटी इतिहासात जो पहिला कसोटी सामना टाय झाला त्यात शतक करण्याचा कारनामा सोबर्स यांनी केला होता. त्यांचे हे शतक हे जगातील काही चांगल्या कसोटी शतकांपैकी एक मानले जाते. १९६०मध्ये त्यांनी हे शतक ब्रिसबेनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध केले होते.

८. मित्र आणि क्रिकेटर कोलीइ स्मिथचे अपघाती निधन झाल्यावर सोबर्स यांनी क्रिकेटला खऱ्या अर्थाने मनावर घेतल्याचे त्यांनी स्वत:चा त्यांच्या आत्मचरित्रात सांगितले आहे. जेव्हा हा अपघात झाला तेव्हा गाडी सोबर्स चालवत होते आणि २६ वर्षीय स्मिथ यांनी केवळ २६ कसोटी सामने खेळले होते.

९. जेव्हा त्यांनी इंग्लंड दौरा केला त्यात ७०९ धावा केल्या. त्यांनी यावेळी म्हटले होते की कोलीइ स्मिथ आणि माझ्या अशा दोघांसाठीही मी धावा केल्या आहेत.

https://twitter.com/mohanstatsman/status/770832184605159424?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E770832184605159424&ref_url=https%3A%2F%2Fmahasports.glteyepbzg-jqp3vl997450.p.temp-site.link%2F10-facts-about-sir-garfield-sobers%2F

१०.Wisden Leading Cricketer in the World हा पुरस्कार त्यांना तब्बल ८वेळा मिळाला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

जबरस्त सिक्स अन् मोईनचा पराक्रम! ठोकली टी२०मध्ये दुसरी सर्वात जलद फिफ्टी, युवी अजूनही ‘नंबर १’

जखम दिलेली भारताने आता इंग्लंडने आफ्रिकेविरुद्ध चोळलाय मलम! पहिल्या टी२०त मिळवला तुफानी विजय

सामना जिंकूनही शुभमन गिलच्या मनात राहिली ‘ही’ खदखद! नंतर म्हणाला, ‘सामन्यात आणखी…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment