---Advertisement---

वाढदिवस विशेष: वेगवान गोलंदाज इशांत शर्माबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

---Advertisement---

आज, 2 सप्टेंबर भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माचा 30  वा वाढदिवस. इशांत हा सध्याच्या भारतीय कसोटी संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे.

त्याने भारताकडून आत्तापर्यंत 86 कसोटी सामन्यात  253 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 80 वनडे सामन्यात 115 विकेट्स घेतल्या आहेत.

अशा या भारताच्या वेगवान गोलंदाजाविषयीच्या काही खास गोष्टी-

-इशांत शर्माचा जन्म 2 सप्टेंबर 1988 मध्ये दिल्ली येथे झाला.

-त्याने वयाच्या 14 व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि 18 व्या वर्षी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले.

-इशांतचा 2006 ला 19 वर्षांखालील भारतीय संघाने केलेल्या इंग्लंड दौऱ्यात समावेश होता. विशेष म्हणजे त्याने 19 वर्षांखालील वनडे आणि कसोटी पदार्पण विराट कोहली बरोबर केले आहे.

-तसेच या दोघांनी प्रथम श्रेणी आणि रणजी ट्रॉफी पदार्पणही 2006-07 च्या मोसमात दिल्लीकडून एकाच सामन्यातून केले आहे. त्यांनी पहिला सामना तमिळनाडू विरुद्ध खेळला. याच सामन्यात तमिळनाडूकडून मुरली विजयनेही पदार्पण केले होते.

-इशांतची उंची 6 फूट 4 इंच आहे. त्याच्या या उंचीमुळे त्याचे लंबू हे टोपननाव पडले.

– 2010-11 ला झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये मोहालीतील पहिल्या कसोटी सामन्यात इशांत शर्माने 9 व्या विकेट्ससाठी व्हिव्हिएस लक्ष्मणबरोबर 81 धावांची भागिदारी केली होती.  ही भागिदारी भारत 216 धावांचा पाठलाग करताना केली होती.

त्यावेळी भारताची अवस्था 8 बाद 124 धावा अशी झाली असताना इशांतने लक्ष्मणची चांगली साथ देताना भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होतो. कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या डावात यशस्वी धावांचा पाठलाग करताना 9 व्या विकेटसाठी केलेली ही सर्वाधिक धावांची भागिदारी आहे.

-इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूक हा इशांतचा’बनी’ ठरला आहे. त्याने आत्तापर्यंत कसोटीत कूकला 11 वेळा बाद केले आहे. कूकला सर्वाधिक वेळा बाद करण्यामध्ये इशांत दुसऱ्या क्रमांकावर आहे. यात अव्वल क्रमांकावर मॉर्ने मॉर्केल आहे. 

https://twitter.com/itz_sounder/status/1036179768163487744

-आॅस्ट्रेलियाचे दिग्गज वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राथ हे इशांत शर्माचे आदर्श आहेत.

-मे 2007 मध्ये भारताच्या बांगलादेश दौऱ्यादरम्यान भारतीय गोलंदाज मुनाफ पटेलला दुखापत झाल्याने त्याचा बदली खेळाडू म्हणून इशांत शर्माची निवड करण्यात आली होती. याच दौऱ्यातील कसोटी मालिकेतून इशांतने भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

-इशांतने वनडे पदार्पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 29 जून 2007 ला केले होते. तर टी20मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध 1 फेब्रुवारी 2008 ला पदार्पण केले होते.

-2011-12 मध्ये आॅस्ट्रेलिया दौऱ्यात बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात इशांतने 152.2 च्या गतीने चेंडू टाकला होता. त्याच्या आंतरराष्ट्रीय करकिर्दीतील हा सर्वाधिक गतीने टाकलेला चेंडू आहे.

-2008 मध्ये आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यावेळी तो कपिल देन नंतरचा मालिकावीर होणारा भारताचा पहिला वेगवान गोलंदाज होता. कपिल देव यांना 1883 मध्ये मालिकावीर पुरस्कार देण्यात आला होता.

-2013 ला भारताने जिंकलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदामध्ये इशांतचा मोठा वाटा होता. त्याने अंतिम सामन्यात इंग्लंडच्या रवी बोपाराला आणि इयान मॉर्गनला 18 व्या षटकात बाद केले होते. तसेच उपांत्य फेरीत श्रीलंकेविरुद्ध 3 विकेट्स घेतल्या होत्या.

-कसोटीत 250 विकेट्सचा टप्पा पार करणारा तो भारताचा केवळ तिसरा वेगवान गोलंदाज आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: समारोप सोहळ्यासाठी हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल असणार ध्वजधारक

चौथी कसोटी: इंग्लंडचे तळातले फलंदाज ठरले टीम इंडियासाठी डोकेदुखी

रहाणे, एबी आणि सचिनबद्दल रोहित शर्माने केले मोठे वक्तव्य

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment