भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज हिने बुधवारी (दि. 08 जून) आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली. भारताकडून सर्वाधिक वनडे सामने खेळणाऱ्या मितालीने वयाच्या 16व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. मितालीच्या निवृत्तीच्या निमित्ताने जाणून घेऊया तिच्या कारकीर्दीतील खास गोष्टींविषयी…
मितालीने आत्तापर्यंत 12 कसोटी सामन्यात 699 धावा, 232 वनडे सामन्यात 7805 धावा आणि टी20मध्ये 89 सामन्यात 2364 धावा केल्या आहेत.
भारताच्या या सर्वात यशस्वी महिला फलंदाजाबद्दल काही खास गोष्टी-
-मिताली राजचा जन्म 3 डिसेंबर, 1982 साली जोधपूर, राजस्थानमध्ये झाला. तिचे वडील इंडियन एअर फोर्समध्ये ऑफिसर आहेत.
-मितालीला लहानपणी शास्त्रीय नृत्याची आवड होती. तिने भरतनाट्यम या नृत्य प्रकाराचे धडेही गिरवले होते. तिला यात कारकीर्दही घडवायची होती, पण नंतर ती क्रिकेटकडे वळाली.
-तसेच तिला नागरी सेवेतही (civil services) जाण्याची इच्छा होती.
-मिताली लहानपणी खूप आळशी असल्याने तिला शिस्त लागावी आणि तिच्यातील आळशीपणा जावा म्हणून तिच्या पालकांनी क्रिकेट खेळाशी तिची ओळख करुन दिली. तिने एका मुलाखतीतही सांगितले होते की, ती सुरुवातीला तिच्या पालकांना आनंदात बघण्यासाठी फक्त क्रिकेट खेळायची.
To the one who has inspired so many girls to take up the sport and chase their dreams, many many happy returns of the day @M_Raj03. Wishing you another year full of runs and wins. 🎂 pic.twitter.com/CNNhYmkS0n
— BCCI Women (@BCCIWomen) December 3, 2019
-मितालीचे वय 16 वर्षे 250 दिवस असताना तिचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झाले. तिने आयर्लंडविरुद्ध 26 जून, 1999 मध्ये पदार्पण करताना 114 धावांची शतकी खेळीही केली. ती त्यावेळी वनडे पदार्पणात शतकी खेळी करणारी सर्वात तरुण महिला क्रिकेटपटू ठरली होती.
-त्याचबरोबर तिचे 114 धावा या महिला वनडे पदार्पणातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.
-तसेच वनडे पदार्पणात शतक करणारी ती दुसरी भारतीय महिला ठरली होती. तिने पदार्पण केलेल्या सामन्यातच तिच्याबरोबर रेश्मा गांधीनेही पदार्पण केले होते. तसेच रेश्मानेही शतक केले, पण रेश्माने मितालीच्या आधी शतक केल्याने ती वनडे पदार्पणात शतक करणारी पहिली भारतीय महिला ठरली होती.
-मितालीने आत्तापर्यंत 5 विश्वचषक खेळले असून यात तिने 54.23 च्या सरासरीने 1139 धावा केल्या आहेत.
-मिताली 21 वर्षे 4 दिवसाची असताना तिने पहिल्यांदा भारतीय महिला संघाचे नेतृत्व केले होते. त्यामुळे ती भारतीय महिला संघाची सर्वात तरुण कर्णधारही ठरली. तिने भारतीय महिला संघाचे सर्वाधिक वनडे सामन्यात नेतृत्व केले आहे. आत्तापर्यंत तिने 155 वनडे सामन्यात भारतीय महिला संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली आहे.
At just 19 years of age India's Mithali Raj struck 214 #OnThisDay in 2002 to soar into the record books! pic.twitter.com/KOrh7bEELr
— ICC (@ICC) August 17, 2016
-मितालीने खेळलेल्या 12 कसोटी सामन्यांपैकी तिसरा कसोटी सामना तिच्यासाठी खास ठरला. कारण, तिने त्या सामन्यात द्विशतकी खेळी करताना 214 धावा केल्या. 16 ऑगस्ट, 2002 ला तिने ही खेळी केली होती.
तसेच त्यावेळी महिला कसोटी क्रिकेटमध्ये एका डावातील सर्वोच्च वैयक्तिक धावांचाही विक्रम तिच्या नावावर नोंदवला गेला होता. त्यानंतर पाकिस्तानच्या किरण बलूचने 242 धावा करत मितालीचा हा विक्रम मो़डला.
-मिताली वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारी महिला फलंदाजही आहे.
Happy birthday to Mithali Raj!
No woman has scored more ODI runs than her 6,550 👏👏 pic.twitter.com/uXgTaP6PZR
— ICC (@ICC) December 3, 2018
-मितालीने 3 सप्टेंबर, 2019ला आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
-तिला 2003मध्ये भारत सरकारकडून अर्जून पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच त्यानंतर 2015 मध्ये तिचा भारताचा चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार- पद्मश्री पुरस्कारानेही सन्मान करण्यात आला.
-तसेच तिला 2015 मध्ये विस्डेनचा सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटूही ठरली.
– मितालीला 2021 वर्षी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारी ती भारताची एकूण ५वी क्रिकेटपटू ठरली, तर पहिली महिला क्रिकेटपटू ठरली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या मितालीने पटकावलेत ‘हे’ पुरस्कार, टाका एक नजर
बिग ब्रेकिंग! भारताची दिग्गज क्रिकेटर मिताली राजचा क्रिकेटला गुडबाय
आज विराट नसता, तर ‘तो’ नक्कीच असता, वाचा सीएसकेच्या यशाच्या अनसंग हीरोबद्दल