---Advertisement---

शतकाचा आनंदच इतका झाला की चक्क मैदानावरील पंचांनाच मारली होती धडक; सोशल मीडियावर पडला मिम्सचा पाऊस

On: मंगळवार, जुलै 21, 2020 6:36 PM
---Advertisement---

मुंबई । इंग्लंडचा क्रिकेटर जेसन रॉय 30 वर्षांचा झाला आहे. विध्वंसक खेळीसाठी परिचित असलेल्या जेसने 2019 साली विश्वचषकात शतक साजरे करताना पंचांना धक्का दिला होता. इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यात सामना सुरू होता. या सामन्यात सलामीवीर जेसन चांगला क्रिकेट खेळला.

तो 99 धावांवर होता तेव्हा त्याने जोरदार हिट मारला आणि नॉन-स्ट्राइक एंडकडे धावण्यास सुरवात केली. जेसनला वाटले की त्याची धाव संपली आहे आणि त्याने आनंद साजरा करण्यास सुरवात केली. पण यादरम्यान त्याच्या समोर पंच आहेत हे तो विसरून गेला. पंच आणि जेसन यांचे जोरदार टक्कर झाली. यात पंच धाडकन मैदानावर खाली पडले. त्यानंतर पंचांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. या घटनेवरून सोशल मीडियावर अनेक मीम्सचा पाऊस पडला.

2016 मध्ये श्रीलंकेविरुद्ध अलेक्स हेल्सबरोबर जेसन रॉयने विक्रमी 256 धावांची भागीदारी केली होती. विकेट न गमावता धावांचा पाठलाग करत ही सर्वात मोठी भागीदारी आहे. तसेच इंग्लंड क्रिकेट मधील कोणत्याही विकेटसाठीची ही सर्वात मोठी भागीदारी आहे. त्याशिवाय वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून सर्वोत्कृष्ट 180 धावा करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.

जेसन रॉय हा एली विंटर हिच्या प्रेमात पडला होता. तो तिला भेटला तेव्हा तो त्याच्या ‘टीन एज’ मध्ये होता. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर पुढे लग्नात झाले. त्याने 2017 मध्ये एली विंटरशी लग्न केले आणि 2019 मध्ये त्यांना इर्वली नावाची मुलगी झाली.

https://twitter.com/cricketworldcup/status/1137322883443826688

https://twitter.com/ShivamChatak/status/1149346853168619521

https://twitter.com/VOICE_2U/status/1137328834926305280

https://twitter.com/mahesh_sehra/status/1137414654194589698

जेसनने इंग्लंडकडून खेळताना 5 कसोटी सामन्यात 18च्या सरासरीने 187 धावा केल्या तर 87 वनडेमध्ये 42च्या सरासरीने 3434 धावा केल्या आहेत. टी 20 मध्ये 35 सामन्यात 860 धावांची नोंद त्याच्या नावावर आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---