संपुर्ण नाव- पियुष प्रमोद चावला
जन्मतारिख- 24 डिसेंबर, 1988
जन्मस्थळ- अलिगड, उत्तर प्रदेश
मुख्य संघ- भारत, एअर इंडिया, ऑल स्टार्स, मध्य विभाग, चेम्प्लास्ट, गुजरात, भारत अ, भारत ब, इंडिया ब्ल्यू, इंडिया इमर्जिंग प्लेयर्स, इंडिया ग्रीन, इंडिया रेड, 19 वर्षांखालील भारतीय संघ, भारतीय बोर्ड अध्यभयी एकादश, किंग्स इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान क्रिकेट असोसिएशन अध्यक्षयी एकादश, शेष भारतीय संघ, सोमरशेट, ससेक्स, उत्तर प्रदेश व मुंबई इंडियन्स.
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 9 ते 13 मार्च, 2006, ठिकाण – मोहाली
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध बांग्लादेश, तारिख – 12 मे, 2007, ठिकाण – ढाका
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तारिख – 2 मे, 2010, ठिकाण – ग्रॉस आयलेट
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 3, धावा- 6, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 3, विकेट्स- 7, सर्वोत्तम कामगिरी- 4/69
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 25, धावा- 38, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 236, विकेट्स- 32, सर्वोत्तम कामगिरी- 4/23
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
गोलंदाजी- सामने- 7, विकेट्स- 4, सर्वोत्तम कामगिरी- 2/13
थोडक्यात माहिती-
-सचिन तेंडूलकर हा कसोटीत सर्वात युवा वयात पदार्पण करणारा क्रिकेटपटू होता. त्याच्यानंतर या यादीत पियुष चावलाचा क्रमांक लागतो. त्याने 17 वर्ष आणि 75 दिवसाचा असताना 2006मध्ये इंग्लंडविरुद्ध आपले कसोटी पदार्पण केले होते.
-वयाच्या 16व्या वर्षी देशांतर्गत क्रिकेट खेळताना चावलाने सचिन तेंडूलकरची विकेट घेतली होती.
-2005-06च्या चॅलेंजर ट्रॉफीत चावलाने सचिन तेंडूलकर, एमएस धोनी आणि युवराज सिंगची विकेट घेत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले होते.
-चावला हा 19 वर्षांखालील वनडेत सर्वाधिक विकेट्स (71) घेणारा गोलंदाज आहे. तर, 19 वर्षांखालील कसोटीत सर्वोत्कृष्ट गोलंदाजी सरासरीत (15.82) तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच 2006च्या विश्वचषकात त्याने सर्वाधिक विकेट्स (13) घेतल्या होत्या.
-कुमार वयापासूनच चावलाने अनेक विश्वचषक खेळले आहेत. तो 2006 मध्ये 19 वर्षांखालील भारतीय विश्वचषक संघाचा, 2007च्या टी20 विश्वचषक संघाचा भाग होता. तसेच 2010चे टी20 विश्वचषक आणि 2011चे विश्वचषक यातही त्याचा सहभाग होता.
-भारतीय संघाकडून खेळताना चावला हा फिरकी गोलंदाजी करायचा, तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो अष्टपैलू कामगिरी करायचा.
-ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 2008सालच्या हैद्राबाद येथील सराव सामन्यात चेंडू चावलाच्या हातात असूनही पंचाने नो बॉल असल्याचे सांगितलेले ऐकून तो चकित झाला होता.
-2009मध्ये चावलाने ससेक्स कांउटी क्रिकेट क्लबकडून क्रिकेट खेळले होते. यावेळी वोर्सेस्टरशायरविरुद्ध पहिला सामना खेळताना त्याने 8 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, 9व्या क्रमांकावर फलंदाजी करत 86 चेंडूत नाबाद 102 धावाही केल्या होत्या. पुढे 2 वर्षे तो काउंटीच्या एकाही सामन्याचा भाग नव्हता. तरी तो 2013मध्ये सोमरसेट संघाकडून खेळला.
-चावलाला त्याचे वडील पारस म्हणत असत. ज्याचा अर्थ असा दगड ज्याच्या स्पर्शाने काहीही सोन्यात रुपांतर होते.
-चावलाला त्याच्या कठीण काळात अनिल कुंबळे यांच्या सल्ल्याची कारकिर्दीत मोठी मदत झाली.
-2013मध्ये चावलाचे अनुभुती चव्हाणसोबत लग्न केले.
-2008 ते 2013 या दरम्यान चावलाने किंग्स इलेव्हन पंजाबकडून 55 सामन्यात 57 विकेट्स घेतल्या होत्या.
-आयपीएलच्या 7व्या हंगामात त्याला कोलकात नाईट रायडर्सने 425 लाख रुयांना विकत घेतले होते.
-2014मध्ये तो कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होता. या हंगामात त्याने 11 सामन्यात 14 विकेट्स घेतल्या होत्या. तर, किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने चौकार मारत केकेआरला दुसऱ्या आयपीएल विजयात मदत केली होती.
-आयपीएलमध्ये 100 विकेट्स घेणारा हरभजन सिंग, लसिथ मलिंगा आणि अमित मिश्रा नंतरचा तो चौथा क्रिकेटपटू होता.
-चावलाने एकावेळी शेन वॉटसनला 117 किमी दर ताशी वेगाने चेंडू टाकला होता. हा कोणत्या फिरकीपटूने टाकलेला सर्वात वेगवान चेंडू होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बर्थडे स्पेशल: ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राच्या आयुष्यातील ‘या’ खास गोष्टी तुम्हाला क्वचितच माहीत असतील
हैदराबाद एफसीची पुन्हा अव्वल स्थानी झेप; बंगळुरू एफसी घरच्या मैदानावर अपयशी