संपुर्ण नाव- रमन लांबा
जन्मतारिख- 2 जानेवारी, 1960
जन्मस्थळ- मेरठ, उत्तर प्रदेश
मृत्यू- 23 फेब्रुवारी, 1998
मुख्य संघ- भारत, आयर्लंड आणि दिल्ली
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख -17 ते 22 डिसेंबर, 1986
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 7 सप्टेंबर, 1986
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 4, धावा- 102, शतके- 0
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 32, धावा- 783, शतके- 1
गोलंदाजी- सामने- 32, विकेट्स- 1, सर्वोत्तम कामगिरी- 1/09
थोडक्यात माहिती-
-रमन लांबा (Raman Lamba) यांच्या हॉलिवूड हिरोसारख्या लूकवरून त्यांना रॅम्बो असे टोपणनाव देण्यात आले होते.
-1986 साली श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण करणारे लांबा यांना कसोटीत विशेष कामगिरी करता आली नव्हती.
-त्यांना नंतर 1989 साली पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत संधी देण्यात आली होती. मात्र, सरावादरम्यान त्यांच्या बोटाला दुखापत झाल्याने त्यांना तो सामना खेळता आला नाही. त्यांच्या बदल्यात मोहम्मद अझरुद्दीन यांना संघात घेण्यात आले होते.
-लांबा यांची वनडेतील कामगिरी चांगली होती. त्यांनी 1986-87मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत 55.60च्या सरासरीने एका शतकासह आणि 2 अर्धशतकासह 278 धावा केल्या होत्या. यासाठी त्यांना मालिकावीर पुरस्कारही देण्यात आला होता.
-कृष्णामाचारी श्रीकांत आणि लांबा यांची वनडेतील सलामी फलंदाजीची जोडी प्रसिद्ध होती.
-1986 साली लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात श्रीकांत यांच्या जागी लांबा यांना क्षेत्ररक्षणास घेण्यात आले होते. मात्र, अचानक श्रीकांत हे मैदानावर उतरल्याने रवी शास्त्री यांच्या पूर्ण षटकात 12 खेळाडूंनी क्षेत्ररक्षण केले होेते.
-1986-87ला भिलई येथे उत्तर विभाग विरुद्ध पश्चिम विभागात यांच्यात दुलिप ट्रॉफीतील अंतिम सामना झाला होता. यावेळी उत्तर विभागाकडून खेळताना लांबा यांनी 320 धावांची मोठी खेळी केलाी होती.
-1990-91साली जमशेदपूर येथे दुलिप ट्रॉफीतील पश्चिम विभागाविरुद्धच्या सामन्यात वादग्रस्त घटना घडला होती. लांबा यांची सामन्यादरम्यान पश्चिम विभागातील क्रिकेटपटू राशिद पटेल यांच्यासह शाब्दिक चकमक झाली होती. यामुळे प्रथम श्रेणीतील पूर्ण हंगामासाठी बीसीसीआयने दोघानांही निलंबीत केले होते.
-1990 साली आयर्लंड येथे लांबा यांची त्यांची पत्नी किम मिशेल क्रोथर्स याच्यांशी भेट झाली होती. पुढे सप्टेंबर 1990ला त्यांचे लग्न झाले. त्यांना जास्मिन ही मुलगी आणि कामरान हा मुलगा आहे.
-1994-95च्या रणजी ट्रॉफी हंगामात 10 सामन्यात लांबा यांनी 1034 धावा केल्या. कोणत्याही फलंदाजाने रणजी ट्रॉफीच्या एका हंगामात केलेल्या त्या सर्वाधिक धावा होत्या.
-हेल्मेट न घातल्यामुळे लांबा यांना त्यांचा जीव गमवावा लागला. 20 फेब्रुवारी 1998 साली बांगलादेशच्या एका प्रिमीअर डिव्हिजन क्रिकेटच्या अंतिम सामन्यात लांबा यांना डोक्याला चेंडू लागून गंभीर दुखापत झाली होती. यासाठी त्यांना 2 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, 22 फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांची पत्नी आपल्या मुलांसह पोर्तुगाल येथे स्थायिक झाल्या.
-लांबा यांच्या जीवनावर आधारित जर्सी हा चित्रपट बनवण्यात आला आहे. या चित्रपटात तमिळ आणि तेलुगु अभिनेता नानी यांनी त्यांची भूमिका साकारली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ओडिशा एफसी आयएसएलमध्ये मुंबई सिटीविरुद्ध नशीब पालटण्यासाठी मैदानावर उतरणार
फक्त वीसच! वर्ल्डकपसाठी बीसीसीआयने आखला खास प्लॅन