पुणे, 3 जुलै 2023: पीवायसी हिंदु जिमखाना तर्फे आयोजित दुसऱ्या पीवायसी रावेतकर फुटबॉल लीग स्पर्धेत बीकेबी युनायटेड या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.
बाऊन्स फिटनेस अँड स्पोर्टस क्लब येथील मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात युनायटेड संघाने बेंचर्स संघाचा 9-1 असा धुव्वा उडवत शानदार सुरुवात केली. बीकेबी युनायटेड संघाने सुरुवातीपसूनच आक्रमक खेळ केला. पहिल्याच मिनिटाला युनायटेडच्या तनिश दडलानीने गोल करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर निशित हेगडेने चेंडूवर सुरेख ताबा मिळवत संघाची आघाडी 2-0 ने वाढवली. पिछाडीवर असलेल्या बेंचर्स संघाच्या अमित परांजपे याने 12व्या मिनिटाला गोल करुन ही आघाडी 2-1 ने कमी केली. पूर्वार्धात 2-1 अशी आघाडी कायम होती.
उत्तरार्धात, मात्र 16व्या मिनिटाला युनायटेडच्या तनिशने आणखी एक गोल करून संघाला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली. 18व्या मिनिटाला तनिशने दिलेल्या पासवर रोहन छाजेडने गोल करून संघाची आघाडी 4-1 अशी वाढवली. पुढच्याच मिनिटाला सिध्दार्थ बदामीकरने गोल केला. निशितने आपला रंगतदार खेळ सूरू ठेवत 20 व 22व्या मिनिटाला दोन गोल करुन संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. बेंचर्स संघाला सामन्यात पुनरागमनासाठी कोणतीच संधी दिली नाही. 28व्या मिनिटाला तनिश दडलानीने गोल करून युनायटेड संघाला बेंचर्स संघावर 9-1 अशा फरकाने विजय मिळवून दिला.
स्पर्धेचे उद्घाटन पीवायसी हिंदु जिमखानाचे मानद सचिव सारंग लागु आणि रावेतकर ग्रुपचे अमोल रावेतकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबचे खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर, स्पर्धा संचालक अभिषेक ताम्हाणे, क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, नंदन डोंगरे, अभिषेक भागवत, सिध्दार्थ दाते, सिध्दार्थ भावे आदी मान्यवर उपस्थित होते. (BKB United’s winning debut in the 2nd PYC Ravetkar Football League)
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
बीकेबी युनायटेड: 2(तनिश दडलानी 1,3,16, 28मि., निशित हेगडे 4,20, 22मि., रोहन छाजेड 18मि., सिध्दार्थ बदामीकर 19मि.) वि.वि.एनसीएस बेंचर्स: 1(अमित परांजपे 12मि.);
महत्वाच्या बातम्या –
नेदरलँड्सच्या विश्वचषक 2023 साठी आशा कामय! विक्रमजीत सिंगच्या शतकामुळे ओमान 74 धावांनी पराभूत
‘हा’ दिग्गज बनणार भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक! बांगलादेश दौऱ्याआधी स्वीकारणार जबाबदारी