पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या वतीने आयोजित आठव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत अंतिम फेरीत ब्लॅक हॉक्स संघाने ब्लेझिंग ग्रिफिन्सचा 4-3 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद संपादन केले. या स्पर्धेत अंतिम फेरीच्या सामन्यात गोल्डन खुल्या दुहेरी 1मध्ये हॉक्सच्या प्रथम वाणी व विनीत रुकारी यांनी ग्रीफिन्सच्या आकाश सूर्यवंशी व विक्रांत पाटील यांचा 21-14, 21-11 असा पराभव करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर सिल्व्हर खुला दुहेरी 3मध्ये हॉक्सच्या आशुतोष सोमण व तन्मय चितळे यांना ग्रीफिन्सच्या आदित्य देशपांडे व निखिल चितळे यांनी 13-21, 08-21 असे पराभूत करून बरोबरी साधून दिली.
गोल्डन मिश्र खुला दुहेरीत तन्मय आगाशेने राधिका इंगळहाळीकरच्या साथीत ग्रीफिन्सच्या करण पाटील व आरुशी पांडे यांचा 21-09, 21-10 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. पण हि आघाडी फार काळ हॉक्सला टिकवता आली नाही. वाईजमन खुल्या दुहेरीत हॉक्सच्या अभिजीत गानू व आनंद घाटे याना ग्रीफिन्सच्या राहुल पाठक व श्रीदत्त शानबाग यांनी 06-21, 11-21 असे तर, सिल्व्हर खुला दुहेरी 4मध्ये हॉक्सच्या ईशान पारेख व शरयू राव याना ईशान भाले व विमल हंसराज यांनी 08-21, 17-21 असे पराभूत करून संघाला आघाडी मिळवून दिली.
गोल्डन खुल्या दुहेरी 2गटात हॉक्सच्या अनिश राणे व नैमिश पालेकर या जोडीने ग्रीफिन्सच्या ईशान लागु व हर्षवर्धन आपटे यांचा 21-07, 21-09 असा पराभव करून बरोबरी साधली व सामन्यातील आपले आव्हान कायम ठेवले. सामना बबरोबरीत सुटल्यामुळे टायब्रेकर घेण्यात आला. टायब्रेकमध्ये हॉक्सच्या अनिश राणे याने तन्मय आगाशेच्या साथीत ग्रीफिन्सच्या निखिल चितळे व करण पाटील यांना 21-13, 21-16 असा पराभव करून संघाचा विजय सुकर केला. सामनावीर तन्मय आगाशे ठरला.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व पदक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ट्रूस्पेसचे संचालक आश्विन त्रिमल, पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबचे मानद सचिव सारंग लागु, क्लबच्या बॅडमिंटन विभागाचे सचिव तन्मय आगाशे, अभिषेक ताम्हाणे,देवेंद्र चितळे, तुषार नगरकर, सिद्धार्थ निवसरकर, नंदन डोंगरे, कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते. नंदन डोंगरे यांनी प्रास्ताविक केले, तर सिद्धार्थ निवसरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
ब्लॅक हॉक्स वि.वि.ब्लेझिंग ग्रीफिन्स 4-3 (गोल्डन खुला दुहेरी 1: प्रथम वाणी/विनीत रुकारी वि.वि.आकाश सूर्यवंशी/विक्रांत पाटील 21-14, 21-11; सिल्व्हर खुला दुहेरी 3: आशुतोष सोमण/तन्मय चितळे पराभुत वि.आदित्य देशपांडे/निखिल चितळे 13-21, 08-21; गोल्डन मिश्र खुला दुहेरी: तन्मय आगाशे/राधिका इंगळहाळीकर वि.वि.करण पाटील/आरुशी पांडे 21-09, 21-10; वाईजमन खुला दुहेरी: अभिजीत गानू/आनंद घाटे पराभुत वि.राहुल पाठक/श्रीदत्त शानबाग 06-21, 11-21; सिल्व्हर खुला दुहेरी 4: ईशान पारेख/शरयू राव पराभुत वि.ईशान भाले/विमल हंसराज 08-21, 17-21; गोल्डन खुला दुहेरी 2: अनिश राणे/नैमिश पालेकर वि.वि.ईशान लागु/हर्षवर्धन आपटे 21-07, 21-09; टायब्रेकर: अनिश राणे/तन्मय आगाशे वि.वि.निखिल चितळे/करण पाटील 21-13, 21-16); सामनावीर-तन्मय आगाशे.
इतर पारितोषिके:
बेस्ट प्लेअर गोल्डन ओपन दुहेरी गट: पुरुष: विक्रांत पाटील
बेस्ट प्लेअर गोल्डन ओपन दुहेरी गट: महिला: सारा नवरे
बेस्ट प्लेअर सिल्व्हर ओपन दुहेरी गट: पुरुष : समीर जालन व अनिकेत सहस्रबुद्धे
बेस्ट प्लेअर सिल्व्हर ओपन दुहेरी गट: महिला: नेहा लागु
बेस्ट वाईजमन: अविनाश दोशी
बेस्ट 18 वर्षाखालील खेळाडू: मुले: निखिल चितळे
बेस्ट 18 वर्षाखालील खेळाडू: मुली: आरुशी पांडे
प्लेअर ऑफ द टूर्नामेंट: मुले: अनिश राणे;
प्लेअर ऑफ द टूर्नामेंट: मुली: राधिका इंगळहळीकर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हार्दिक कर्णधाराला अनेक पर्याय देतो’ गुजरातच्या सहकाऱ्याने पंड्याबाबत केलंय खास विधान
Asia Cup 2022: केएल राहुलसाठी शेवटची संधी? टीम इंंडियाचे समीकरण बिघडतयं
शारजाहच्या मैदानावर आशिया चषकातील पहिला सामना! बांग्लादेश अन् अफगाणिस्तान सज्ज