यावर्षी टोकियो येथे ऑलिंपिक स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेला येत्या २३ जुलैपासून सुरुवात होईल. या स्पर्धेसाठी सर्वच खेळाडूंची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पथकाला शुभेच्छा दिल्या असून त्यांनी खेळाडूंना पाठिंबा देण्याचे अवाहन सर्वांना केले आहे. यावेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही भारतीय पथकाला टोकियो ऑलिंपिकसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
बीसीसीआयने शनिवारी (१० जुलै) एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय महिला आणि पुरुष क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी टोकियो ऑलिंपिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, मिताली राज, हरमनप्रीत कौर, हरलीन देवोल, जेमिमाह रोड्रिग्ज हे खेळाडू शुभेच्छा देताना दिसत आहेत.
बीसीसीआयने या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की ‘टोकियो ऑलिंपिकसाठी भारतीय खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी बीसीसीआय अभिमानाने भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची साथ देत आहे. त्यांनी खूप मेहनत घेतली आहे आणि स्पर्धेसाठी उत्सुक आहेत. एकत्र येऊन भारताला प्रोत्साहन देऊ.’
काहीदिवसांपूर्वीच भारतीय क्रीडा मंत्रालयाने यावर्षीच्या ऑलिंपिकसाठी ‘चिअर फॉर इंडिया’ अशी थीम लाँच केली आहे.
The BCCI proudly joins the Honourable Prime Minister of India Shri @narendramodi in extending our wholehearted support to the Team India Athletes @Tokyo2020
They have trained hard and are raring to go.
Let us get together and #Cheer4India | @JayShah | @IndiaSports pic.twitter.com/KDDr5wA28S
— BCCI (@BCCI) July 10, 2021
बीसीसीआयने भारतीय पथकासाठी तब्बल १० कोटी रुपयांचे योगदान
बीसीसीआयने काहीदिवसांपूर्वीच टोकियो ऑलिंपिकसाठी भारतीय पथकासाठी तब्बल १० कोटी रुपयांचे योगदान देणार असल्याचे जाहीर केले होते. बीसीसीआय या १० कोटींमधील २.५ कोटी रुपये खेळाडूंना त्यांच्या अंतिम तयारीसाठी देणार आहे. तर ७.५ कोटी रुपये टोकियो ऑलिंपिकच्या प्रचार मोहिमेसाठी देणार आहे.
हे खेळाडू ध्वजधारक
टोकियो ऑलिंपिकच्या उद्धाटन सोहळ्या बॉक्सर मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग भारतीय पथकाचे ध्वजधारक असतील. तर समारोप सोहळ्यासाठी कुस्तीपटू बजरंग पुनिया ध्वजधारक असेल.
या ऑलिंपिक स्पर्धेत १२६ भारतीय खेळाडू सहभागी होणार आहे. तसेच ७५ अधिकारी भारतीय पथकात असतील.
महत्त्वाच्या बातम्या –
मालिका पुढे ढकलण्याबरोबरच श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडे बीसीसीआयने केली होती ‘ही’ मोठी मागणी
रिचा घोषमध्ये दिसली धोनीची झलक, विजेच्या वेगाने फलंदाजाला केले यष्टिचीत, पाहा व्हिडिओ