परदेश दौऱ्यात संघाबरोबर जाणाऱ्या अधिकाऱ्यांच्या प्रत्येक दिवसाला दिलेल्या मानधनात (डीए) मोठी कपात होण्याची शक्यता आहे. टाइम्स ऑफ इंडिया मधील वृत्तानुसार ही रक्कम ही कपात आधीच सुरु झालेली आहे.
परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघातील प्रत्येक खेळाडूला मिळणाऱ्या डीएच्या पाचपट डीए ही अधिकाऱ्यांना मिळते. सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाबरोबर जाणाऱ्या अधिकाऱ्यांचा एका दिवसाचा भत्ता हा £500 (अंदाजे ४१५०० रुपये ) असेल. तर खेळाडूंना प्रत्येक दिवसाकाठी भत्ता म्हणून £125 (अंदाजे १०३०० रुपये ) रुपये मिळतील. हा भत्ता मॅच फी सोडून वेगळा असतो. भारतीय खेळाडूंना मॅच फी ही कसोटीसाठी १५ लाख, एकदिवसीय सामन्यासाठी ६ लाख तर टी२० साठी ३ लाख असते.
डीए हा विमानतळावरून हॉटेलमध्ये जाण्यासाठीचा खर्च, हॉटेल निवास, अन्न आणि रोजच्या टॅक्सी प्रवासासाठी दिला जातो. मग खेळाडू आणि अधिकारी यांच्या डीएच्या रकमेत एवढी तफावत कशाला?
अधिकाऱ्यांच्या मानधनात बीसीसीआयने दोन वर्षांपूर्वी वाढ केली. $500 वरून ती आता $750वर आली आहे. त्याबरोबर त्यांना परदेश दौऱ्यात प्रथम श्रेणीच विमान तिकीटही दिल जात. खेळाडूंना बिजनेस क्लासच तिकीट परदेश दौऱ्यावर दिल जात.
काही अधिकारी हे वर्षाकाठी २ कोटी रुपये या परदेश दौऱ्यावर खर्च करतात. हा खर्च ग्रेड एच्या खेळाडूंपेक्षाही जास्त आहे.