भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत संघाचे नेतृत्व करत आहे. पंत संघाचा कर्णधार जरी बनला असला, तरी त्याचे वैयक्तिक प्रदर्शन मात्र खूपच निराशाजनक राहिले आहे. टी-२० मालिकेत भारताने २-२ असी बरोबरील साधली असली, तरी कर्णधार पंतच्या प्रदर्शनावार अनेकजण टीका करत आहेत. यामध्ये बॉलिवुड अभिनेता कमाक आर खानचा देखील समावेश आहे.
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या टी२० मालिकेतील पहिले दोन्ही सामने गमावले होते, पण तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात संघाने विजय मिळला. या विजयानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ बरोबरीवर आहेत. शेवटचा सामना १९ जूनला बेंगलोरमध्ये खेळला जाणार आहे, जो दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे.
मालिकेतील चौथा सामना राजकोमध्ये १७ जून रोजी खेळला गेला, जो भारताने ८२ धावांच्या अंतराने जिंकला. कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) या सामन्यात २३ चेंडू खेळला आणि अवघ्या १७ धावा करून बाद झाला. मालिकेतील सलग चौथ्या सामन्यात पंत अपेक्षित प्रदर्शन करू शकला नसल्यामुळे चाहते त्याच्यावर चांगलेच निराश झाले आहेत. यामध्ये कमाल आर खान म्हणजेच केआरके (KRK) देखील सहभागी आहे. केआरके नेहमीच त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतो.
रिषभ पंतला खडसावण्यासाठी त्याच्या ज्या पद्धतीचे शब्द वापरले आहेत, त्याची देखील चांगलीच चर्चा होत आहे. अधिक ट्वीटर खात्यावरून त्याने पंतविषयी लिहिले की, “मला खरच मसजत नाहीये की, पंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचा सदस्य कसकाय असू शकतो ? जो खेळाडू प्रत्येक चेंडूवर खेळपट्टीवर लोळतो, तो चांगला खेळाडू कसा असू शकतो.”
दरम्यान, पंतच्या चालू टी-२० मालिकेतील प्रदर्शन पाहिले, तर ते २९, ५, ६, आणि १७ असे राहिले आहे. एवढेच नाही आयपीएल २०२२ मध्ये तो दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होता आणि त्याठिकाणी देखील त्याचे प्रदर्शन अतिशय सुमार दिसले. त्याने यावर्षी आयपीएलमध्ये खेळलेल्या १४ सामन्यांमध्ये ३०.९१ च्या सरासरीने ३४० धावा केल्या. यादरम्यान त्याला एकही अर्धशतक करता आले नाही. त्याच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्स संघ प्लेऑफमध्येही जागा मिळवू शकला नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारताचे मालिका विजयाचे स्वप्न भंगणार!, ‘या’ पाच गोष्टी पराभवाला ठरणार कारणीभूत
दिनेश कार्तिकचं पहिलं प्रेम हिरावणारा क्रिकेटर पुनरागमनासाठी सज्ज, २ वर्षांनंतर उतरतोय मैदानात