मुंबई इंडियन्सला ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकून देणाऱ्या रोहित शर्माची बॅट आयपीएल २०२२च्या सुरुवातीला शांत दिसत होती. मात्र, मुंबईच्या हंगामातील १०व्या सामन्यात खेळताना रोहितची बॅट चांगलीच तळपली. त्याची फलंदाजी पाहून सामना पाहण्यासाठी आलेला बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगही जाम खुश झाला. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
या सामन्यात गुजरात (Gujarat Titans) संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी पहिल्यांदा फलंदाजीसाठी आलेल्या मुंबईकडून (Mumbai Indians) रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि ईशान किशन (Ishan Kishan) यांनी डावाची सुरुवात केली. यावेळी रोहित आधीपेक्षा वेगळ्याच अंदाजात फलंदाजी करताना दिसला. त्याने किशनसोबत धावा चोपत धावफलक हलता ठेवला. या दोघांनीही पॉवरप्लेमध्ये (पहिल्या ६ षटकात) एकही विकेट न घालवता ६३ धावांची भागीदारी रचली. दोघांचीही ही भागीदारी मुंबईची हंगामातील सर्वोत्तम धावसंख्या होती. या भागीदारीत रोहितने २४ चेंडूत ४२ धावांचे योगदान दिले होते. या डावादरम्यान रोहितने फ्लिक शॉट खेळत मिडविकेटच्या वरून षटकार खेचला. या शॉटमार्फत त्याने दाखवून दिले की, तो देखील मोठी खेळी करण्यापासून जास्त दूर नाहीये.
This shot @ImRo45 🥵🔥
That celebration from @RanveerOfficial 😍 pic.twitter.com/TIW7fefHOS— Hitman🦅 (@pullshot___45) May 6, 2022
रोहितची फलंदाजी पाहून स्टेडिअममध्ये उपस्थित असलेला बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगदेखील (Ranveer Singh) आनंदी झाला. सामन्यादरम्यान जेव्हा- जेव्हा रोहितने चेंडू मैदानाबाहेर पाठवला, तेव्हा रणवीर एखाद्या चाहत्याप्रमाणे आपल्या आवडत्या फलंदाजाला चीअर करताना दिसला. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये रणवीर रोहितच्या फलंदाजीची मजा घेताना दिसू शकतो. रणवीर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहितचा मोठा चाहता आहे आणि नेहमीच स्टेडिअममध्ये सामना पाहण्यासाठी येत असतो.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या सामन्याचा आढावा
या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईने ६ विकेट्स गमावत १७७ धावा केल्या होत्या. तसेच, गुजरातपुढे १७८ धावांचा डोंगर उभा केला होता. यापूर्वी याहून जास्त आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने सहजरीत्या विजय मिळवला होता. मात्र, मुंबईविरुद्ध त्यांना ते शक्य झाले नाही. त्यांना या आव्हानाचा पाठलाग करताना ५ विकेट्स गमावत १७२ धावाच करता आल्या. त्यामुळे मुंबईने ५ धावांनी सामना जिंकला. मात्र, सामना जिंकूनही ते गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर गुजरातही अव्वलस्थानी कायम राहिला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेटमध्ये कसा करण्यात येतो खेळपट्टी झाकण्यासाठी कव्हर्सचा उपयोग, जाणून घ्या काय आहेत नियम
आरारा खतरनाक! मुंबईने अव्वल क्रमांकावरील गुजरातला हरवल्यावर सोशल मीडियावर मीम्सचा सुळसुळाट
IPL | अटीतटीच्या लढतीत मुंबईच सर्वांना वरचढ! ‘इतक्यांदा’ मिळवला ५ पेक्षा कमी धावांनी विजय