भारतीय संघाचा स्फोटक यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत सध्या जोरदार चर्चेत आहे. भारतीय संघाकडून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत दमदार कामगिरी केल्यानंतर आता आयपीएल मध्ये त्याला दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्यामुळे सध्या ज्याच्या त्याच्या तोंडी पंतचेच नाव आहे.
याच निमित्ताने त्याच्याशी निगडीत एक जुना किस्साही आता चर्चेत आला आहे. बॉलिवुड अभिनेत्री असलेल्या उर्वशी रौतेलासह त्याचे अफेअर असल्याच्या चर्चा बर्याच काळ रंगल्या होत्या. अर्थात या दोघांनी याबाबत जाहीरपणे काहीही बोलणे टाळले होते..
मात्र २०१९ मध्ये या दोघांना एकत्र पाहिल्या गेले होते. त्यानंतर दोघांचे अफेअर असल्याच्या चर्चा सोशल मिडीयावर सुरू झाल्या होत्या. मात्र त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाल्याचे वृत्त समोर आले होते. इतकेच नव्हे तर रिषभ पंतने उर्वशीला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केल्याचीही माहिती होती.
आता या चर्चेवर उर्वशीने उत्तर दिले आहे. त्याचे झाले असे की, सध्याच्या सोशल मिडीयावरील ट्रेंडनुसार उर्वशीने देखील एक प्रश्नोत्तराचे सत्र आपल्या अकाऊंटवर ठेवले होते. यात चाहत्यांनी तिच्या खाजगी आणि व्यावसायिक अशा दोन्ही आयुष्यांबद्दल प्रश्न विचारले.
यात एका चाहत्याने तिला ‘तुमचा आवडता क्रिकेटपटू कोण’, असा प्रश्न विचारला. मात्र याचे सरळ उत्तर देणे तिने टाळले. याऐवजी तिने ‘मी क्रिकेट पाहत नाही. तसेच कुठल्याही क्रिकेटपटूला मी ओळखत देखील नाही. मात्र सचिन सर (सचिन तेंडुलकर) आणि विराट सर (विराट कोहली) यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे”, असे उत्तर दिले.
त्यामुळे आता पंत विषयी आडून विचारलेल्या प्रश्नाला उर्वशीने बगल दिली आहे, असेच म्हणावे लागेल. तसेच दोन वर्षांपूर्वीच्या चर्चा काहीही असल्या तरी आता दोघेही आपल्याला व्यावसायिक आयुष्यात पुढे जात असल्याचेही दिसते आहे.
महत्वाच्या बातम्या:
व्हिडिओ : ज्युनियर धोनीने घेतली सिनियर धोनीची मुलाखत, एका खास गोष्टीचा केला खुलासा
धोनीच्या एका षटकराने जर विश्वचषक जिंकून दिला असेल, तर युवराजने ६ जिंकलेत, गंभीरची तिखट प्रतिक्रिया
शाब्बास भावा..!! पाकिस्तानविरुद्ध खेळणार का? खलील अहमदने एका वाक्यात जिंकले कोट्यवधी भारतीयांचे हृदय