भारताचा युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपल्या यॉर्कर चेंडूने अनेक दिग्गज फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या आहेत. सध्या तो जगातला क्रमांक एकचा गोलंदाज असून त्याने खूप कमी काळात जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. आपल्या धारदार गोलंदाजीने दिग्गज फलंदाजांची भंबेरी उडवणाऱ्या जसप्रीत बुमराहचे जगभर चाहते आहेत. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटाणी हीदेखील जसप्रीत बुमराहची चाहती आहे.
दिशा पटाणी ही क्रिकेटला फॉलो करते. ती सतत जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचं कौतुक करत असते. ती बुमराहची चाहती आहे. तो मॅचविनर खेळाडू असल्याचे वारंवार सांगत असते. तिने एमएस धोनीवर आधारित चित्रपटात देखील महत्त्वाची भूमिका केली होती.
दिशा ‘मलंग’ या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी न्यूझीलंड आणि भारत यांच्यात यावर्षी झालेल्या पाचव्या टी 20 सामन्याच्यावेळी ऑफिशिअल ब्रॉडकास्टिंग स्टुडिओमध्ये देखील आली होती. यावेळी चित्रपटातील इतर स्टार देखील होती.
‘मलंग’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी दिशा म्हणाली होती की, “मला जर कुणी मॅचविनर खेळाडू निवडण्यास सांगितले तर मी जसप्रीत बुमराहचे नाव घेईन. तो आपल्या संघातला सर्वोत्तम खेळाडू आहे.” यावेळी स्टुडिओमध्ये दिशासोबत अनिल कपूर देखील स्टुडिओमध्ये होते. यावेळी अनिल कपूरला आवडता क्रिकेटपटू कोण असे विचारल्यावर त्याने विराट कोहलीचे नाव घेतले .
या सामन्यात जसप्रीत बुमराहला सामनावीरचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. बुमराहने या सामन्यात 4 षटकांत 12 धावा देत 3 महत्त्वपूर्ण गडी बाद केले होते. तसेच जसप्रीत बुमराहने सर्वाधिक निर्धाव षटक टाकण्याचा जागतिक विक्रम देखील स्वतःच्या नावावर केला. त्याच्या या दमदार कामगिरीमुळेच भारताने ही टी 20 मालिका 5-0 अशा फरकाने जिंकली होती.
या मालिकेपूर्वी जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे काही सामन्यात खेळू शकला नव्हता.