गेल्या कित्येक महिन्यांपासून भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना पाहण्याची वाट पाहिली जात होती. हा सामना रविवारी (२४ ऑक्टोबर ) दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पार पडला. गेल्या १४ वर्षांपासून टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाला भारतीय संघाविरुद्ध एकही विजय मिळवता आला नव्हता. परंतु, या सामन्यात पाकिस्तान संघाने विजयाची प्रतीक्षा संपवली आणि भारतीय संघावर १० गडी राखून जोरदार विजय मिळवला. या सामन्यात बॉलिवूड कलाकारांनी देखील हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले होते.
जेव्हा जेव्हा भारत-पाकिस्तान संघ आमने-सामने येत असतात, त्यावेळी वातावरण तापलेल असतं. जितकी गर्दी अंतिम सामना पाहण्यासाठी नसते, त्याहून अधिक गर्दी हा सामना पाहण्यासाठी असते. त्यामुळे अनेक दिग्गज मंडळी आणि बॉलिवूड स्टार्स वेळात वेळ काढून या सामन्याचा आनंद घेण्यासाठी मैदानात येत असतात.
रविवारी देखील हा सामना पाहण्यासाठी दिग्गज बॉलिवुड कलाकार दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये उपस्थित होते. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा सामना पाहताना दिसून आला. तसेच पंजाब किंग्स संघाची संघमालक प्रीती झिंटा देखील या सामन्याच्या आनंद घेताना दिसून आली होती. तर उर्वशी रौतेला देखील हातात तिरंगा घेऊन भारतीय संघाचा उत्साह वाढवताना दिसून आली होती. यासह मौनी रॉय देखील स्टेडियममध्ये उपस्थित राहून या सामन्याचा आनंद घेताना दिसून आली.
A sporty #karvachauth with my man in blue ❤️ 🇮🇳🇮🇳 #patiparmeshwar #bleedblue #INDvPAK #t20worldcup2021 #dubai #ting pic.twitter.com/48uxBtuYQj
— Preity G Zinta (@realpreityzinta) October 24, 2021
https://twitter.com/Imsnehasingh/status/1452523244141961220
Jay shah and akshay kumar on extra run given by pakistan team😀😀 pic.twitter.com/lugzLRz6Pm
— SVK (@svk157161) October 24, 2021
Mouni Roy out there and cheering
up for our India! 🇮🇳♥️📸 pic.twitter.com/wAx2wQDuP1— Twood VIP™ (@Twood_VIP) October 24, 2021
या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून कर्णधार विराट कोहलीने ५७ धावांची खेळी केली. तर रिषभ पंतने ३९ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला २० षटक अखेर ७ बाद १५१ धावा करण्यात यश आले होते.
त्यानंतर १५२ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाकडून मोहम्मद रिजवानने नाबाद ७९ आणि बाबर आजमने नाबाद ६८ धावा करत पाकिस्तान संघाला १० गडी राखून विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय खेळाडूंचा ‘त्या’ अभिमानास्पद मोहिमेस गुडघ्यावर बसत पाठिंबा, पण पाकिस्तानी खेळाडूंनी मात्र…
पराभवाच्या जखमेवर दुखापतीचं मीठ, भारताचा ‘हा’ स्टार क्रिकेटर रुग्णालयात भरती; संघाची वाढली चिंता
रिजवानने उत्कृष्ट फलंदाजी तर केलीच, पण ‘या’ गोष्टीने लाखो चाहत्यांची हृदयही जिंकली; व्हिडिओ व्हायरल