2025 चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये आयोजित होणार आहे. टीम इंडिया मात्र या स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाणार नाही. भारत सरकारनं बीसीसीआयला पाकिस्तानात संघ न पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, पाकिस्तानातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानातील क्वेट्टा येथे बॉम्बस्फोट झाला आहे. यामध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. याशिवाय अनेक जण जखमीही झाले आहेत. रिपोर्ट्सनुसार, भारतानं सुरक्षेचं कारण सांगूनच पाकिस्तानात जाण्यास नकार दिला आहे.
वास्तविक, पाकिस्तानमधील क्वेटा रेल्वे स्थानकावर बॉम्बस्फोट झाला. ‘टाईम्स ऑफ इंडिया’नं दिलेल्या वृत्तानुसार, या स्फोटात किमान 25 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अनेक जण जखमीही झाले. स्फोटामुळे स्थानकाचा मोठा भाग प्रभावित झाला. हा आत्मघातकी हल्ला होता. स्फोट झाला तेव्हा प्रवासी जफर एक्स्प्रेस गाडीची वाट पाहत होते.
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्ताननं लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमचं नूतनीकरण केलं आहे. त्यासाठी आयसीसीकडून निधी मिळाला. लाहोरच्या या स्टेडियममध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने होणार आहेत. जर आपण क्वेटा आणि लाहोरमधील अंतराबद्दल बोललो, तर ते सुमारे 973 किलोमीटर आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया येईल, अशी आशा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला होती. मात्र ताज्या अपडेटनुसार भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही. ‘इंडियन एक्सप्रेस’मधील एका बातमीनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं संघाला पाठवण्यास नकार दिला आहे. बीसीसीआयनं सुरक्षेचे कारण सांगितलंय. टीम इंडिया पाकिस्तानात यावी यासाठी पीसीबीनं सर्वतोपरी प्रयत्न केले होते. परंतु त्यांचे प्रयत्न फसले. आता स्पर्धेचं आयोजन हायब्रीड मोडवर होऊ शकतो. भारतीय संघ आपले सामने युएईमध्ये खेळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा –
ऑस्ट्रेलियन लीगमध्ये भारतीय खेळाडूंचं वर्चस्व, धमाकेदार खेळीसह मिळवून दिला संघाला विजय
ठरलं! चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मोडमध्ये होणार, या देशांत खेळले जाऊ शकतात भारताचे सामने
426 धावा….46 चौकार अन् 12 षटकार!! या फलंदाजाच्या वादळी खेळीनं मोडले सर्व रेकॉर्ड