पुणे। चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत दुहेरीत रोहन बोपन्ना व रामकुमार रामनाथन या भारतीय स्टार जोडीने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत या गटाचे विजेतेपद संपादन केले.
म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत दुहेरीत अंतिम फेरीत रोहन बोपन्ना व रामकुमार रामनाथन या भारतीय जोडीने लूक सॅव्हील व जॉन पॅट्रिक स्मिथ या ऑस्ट्रेलियन जोडीचा पराभव करून एटीपी स्पर्धेचे दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. तर, रोहन बोपन्नाचे दुहेरीतील हे 21वे विजेतेपद असून पुण्यातील स्पर्धेतील त्याचे हे दुसरे विजेतेपद आहे. याआधी 2019मध्ये रोहन याने दिवीज शरणच्या साथीत विजेतेपद विजेतेपद पटकावले होते. दक्षिण आशियातील एकमेव एटीपी 250 स्पर्धा असलेल्या या चौथ्या मालिकेचे आयोजन महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या वतीने करण्यात आले आहे.
रोहन व रामकुमार या भारतीय जोडीने वर्षाची सुरुवात चांगली करताना जानेवारी मध्ये ऍडलेड येथे पहिले विजेतेपद मिळवले होते. सामन्यात या जोडीने अव्वल मानांकित जोडीविरुद्ध सुरेख खेळ करताना 5-4 अशी आघाडी घेतली. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियन जोडीने कमबॅक करत बरोबरी साधली व हा सेट टायब्रेकमध्ये गेला. आपल्या पहिल्या विजेतेपदाच्या शोधात असलेल्या या ऑस्ट्रेलियन जोडीने पहिला सेट तासाभरात जिंकून आघाडी मिळवली.
अनुभवी खेळाडू रोहन बोपन्ना व युवा खेळाडू रामकुमार यांनी कडवी झुंज देत दुसऱ्या सेटमध्ये 4-2 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये आपली आघाडी कायम ठेवत रोहन व रामकुमार यांनी हा सेट जिंकून बरोबरी साधली. त्यानंतर सूपर टायब्रेकमध्ये रोहन व रामकुमार यांनी सुरेख खेळ करत हा सेट जिंकून विजय मिळवला.हि प्रतिष्ठेची स्पर्धा आयएमजी यांच्या मालकी ची असून राईज वर्ल्डवाईड इन इंडिया यांनी संचालित केली आहे.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार, टाटा मोटर्सचे उपाध्यक्ष मोहन सावरकर, एआयटीएचे मानद सचिव अनिल धुपर, एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा, स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार यांच्या हस्ते करण्यात आले.
दुहेरी गट: अंतिम फेरी:
रोहन बोपन्ना/रामकुमार रामनाथन(भारत)वि.वि.लूक सॅव्हील/जॉन पॅट्रिक स्मिथ(ऑस्ट्रेलिया)6-7 (10-12), 6-3, 10-6
महत्त्वाच्या बातम्या –