न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला व्हाईटवॉश मिळाला. हा पराभव जिव्हारी लागण्याचे कारण म्हणजे, भारतीय संघ आपल्या घरच्या मैदानावर ही मालिका खेळत होता. आता भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा 22 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. जिथे दोन्ही संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळतील. यासाठी केएल राहुल आणि ध्रुव जुरेल यांचाही भारतीय संघात समावेश आहे. या मालिकेच्या आधी राहुल आणि जुरेल यांना एक विशेष संधी मिळणार आहे. या दोघांचाही भारत अ संघात समावेश झाला असून, बॉर्डर-गावसकर मालिकेआधी यांच्याकडे सरावाची चांगली संधी असेल.
भारतीय संघाचा फलंदाज केएल राहुल आणि युवा यष्टीरक्षक ध्रुव जुरेल यांना बॉर्डर-गावसकर मालिकेपूर्वी सराव करण्याची महत्त्वाची संधी मिळणार आहे. बीसीसीआयने आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दोन्ही खेळाडूंचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. एका वृत्तानुसार, राहुल आणि जुरेल मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या दुसऱ्या चार दिवसीय अनधिकृत कसोटीत भाग घेतील. हा सामना 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान खेळला जाईल.
आगामी कसोटी मालिकेसाठी राहुल आणि जुरेल यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे, जुरेलला यष्टिरक्षक रिषभ पंतचा बॅकअप म्हणून ठेवण्यात आले आहे. त्याचवेळी सर्फराज खानच्या जागी राहुलचा कसोटी संघात समावेश होण्याची शक्यता आहे. राहुलची कामगिरी अलीकडे खराब झाली आहे, त्यामुळे ही अनधिकृत कसोटी त्याच्यासाठी स्वत:ला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी ठरू शकते.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईस्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध्द कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
राखीव : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी अपडेट! मोहम्मद शमी रणजी ट्राॅफी स्पर्धेतून बाहेर! बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीचे दरवाजे बंद
IND vs SA; टी20 मालिकेचं पूर्ण वेळापत्रक! कधी आणि कुठे पाहायचे सामने, जाणून घ्या सर्वकाही
AUS vs PAK; बाबर आझमचे संघात पुनरागमन, पाकिस्तानचा ऑस्ट्रलियाकडून पराभव