भारतीय क्रिकेटपटू वृद्धिमान साहाने यावर्षी फेब्रुवारीमध्ये सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती, ज्यामध्ये त्याने मुलाखत न दिल्याने पत्रकाराकडून धमकी मिळाल्याचा आरोप केला होता. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) पत्रकार बोरिया मुजूमदारवर २ वर्षांची बंदी घालण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या ३ सदस्यीय समितीने भारतीय यष्टीरक्षक वृद्धिमान साहा याला धमकावण्याच्या प्रकरणात मुजूमदारला दोषी ठरवले आहे. त्यामुळे मुजूमदारवर आता भारतातील स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार नाहीय. तसेच त्याला क्रिकेटपटूंना भेटण्याचीही परवानगी दिली जाणार नाहीय.
बीसीसीआयच्या (BCCI) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “आम्ही भारतीय क्रिकेट बोर्डाच्या सर्व राज्यातील क्रिकेट असोसिएशनला मुजूमदारला (Boria Majumdar) स्टेडियममध्ये येऊ न देण्याची सूचना दिली आहे. त्याला भारतात होणाऱ्या सामन्यांसाठी मीडिया मान्यता दिली जाणार नाही. आम्ही त्याला ब्लॅकलिस्ट करण्यासाठी आयसीसीला पत्रही लिहिले आहे. क्रिकेटपटूंना त्याच्यासोबत काम न करण्यास सांगितले गेले (Ban On Boria Majumdar) आहे.”
नेमका धमकी विवाद आहे तरी काय?
फेब्रुवारी महिन्यात कसोटी संघातून वगळल्यानंतर काही तासांनी साहाने (Wriddhiman Saha) ट्विटरवर पत्रकाराशी व्हॉट्सऍपवरील संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. यासोबतच त्याने धमकी मिळाल्याचा आरोपही केला होता. त्याने लिहिले होते की, “भारतीय क्रिकेटमध्ये माझ्या सर्व योगदानानंतर… एका तथाकथित सन्माननीय पत्रकाराशी मला हा सामना करावा लागतो. पत्रकारिता कुठे गेलीये?”
साहाने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये असे लिहिले होते की, “माझी मुलाखत घेईन. तुम्हाला लोकशाही हवी असेल, तर मी तुमच्यावर दबाव आणणार नाही. त्याने केवळ एकच यष्टीरक्षक निवडला. सर्वोत्तम कोण आहे? तुम्ही ११ पत्रकारांची निवड करण्याचा प्रयत्न केला, जो माझ्या मते योग्य नाही. सर्वात जास्त मदत करू शकणारे लोक निवडा. तुम्ही फोन केला नाही. मी तुमची यापुढे कधीही मुलाखत घेणार नाही आणि मला हे नेहमी लक्षात राहील.”
बीसीसीआयने बनवली होती समिती
बीसीसीआयने साहा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीमध्ये बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला, कोषाध्यक्ष अरुण सिंग धुमाळ आणि बीसीसीआय वरिष्ठ परिषद सदस्य प्रभतेज सिंग भाटिया यांच्या नावाचा समावेश होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘कोणताही खेळाडू असू द्या, वाईट काळातून…’, आरसीबीच्या प्रशिक्षकांनी मान्य केला कोहलीचा खराब फॉर्म
सचिनला लाडक्या लेकाकडून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; म्हणाला, ‘माझ्यासाठी जे काही केले आहे…’