---Advertisement---

मोठी बातमी! साहाला धमकावणाऱ्या पत्रकाराचं नाव शेवटी कळलंच; बीसीसीआय देणार उत्तरे

On: शनिवार, मार्च 5, 2022 8:54 PM
Wriddhiman-Saha
---Advertisement---

क्रिकेट विश्वातून महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. मागील काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा चांगलाच चर्चेत होता. संघातून डच्चू मिळाल्यानंतर साहाने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याबद्दल वक्तव्य केले होते. तसेच त्याने एका प्रसिद्ध पत्रकारावर धमकावल्याचाही आरोप केला होता. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने या धमकी विवादाची चौकशी सुरू केली होती. यावर बीसीसीआयने साहाला धमकी देणाऱ्या पत्रकाराचे नाव सांगण्यास सांगितले होते. आधी तर साहाने पत्रकाराचे नाव सांगण्यास नकार दिला होता. मात्र, आता त्याने त्या पत्रकाराच्या नावाचा खुलासा केला आहे.

बीसीसीआयने बनवली होती समिती
बीसीसीआयने साहा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीमध्ये बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला, कोषाध्यक्ष अरुण सिंग धुमाळ आणि बीसीसीआय वरिष्ठ परिषद सदस्य प्रभतेज सिंग भाटिया यांच्या नावाचा समावेश होता. राजीव शुक्ला यांनी माध्यमांना सांगितले आहे की, साहाने समितीला सर्व माहिती दिली आहे. तसेच, ही माहिती ते बीसीसीआयला देणार आहेत.

दुसरीकडे साहा म्हणाला की, “मला ज्या गोष्टी माहिती आहेत, त्या सर्व मी समितीला सांगितल्या आहेत. मी सर्व माहिती त्यांना दिली आहे. बीसीसीआयने मला बैठकीबद्दल बाहेर काहीही सांगायचे नसल्याचे सांगितले आहे. कारण, ते स्वत: सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहेत.”

नेमका धमकी विवाद आहे तरी काय?
मागील महिन्यात कसोटी संघातून वगळल्यानंतर काही तासांनी साहाने ट्विटरवर पत्रकाराशी व्हॉट्सऍपवरील संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. यासोबतच त्याने धमकी मिळाल्याचा आरोपही केला होता. त्याने लिहिले होते की, “भारतीय क्रिकेटमध्ये माझ्या सर्व योगदानानंतर… एका तथाकथित सन्माननीय पत्रकाराशी मला हा सामना करावा लागतो. पत्रकारिता कुठे गेलीये?”

साहाने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये असे लिहिले होते की, “माझी मुलाखत घेईन. तुम्हाला लोकशाही हवी असेल, तर मी तुमच्यावर दबाव आणणार नाही. त्याने केवळ एकच यष्टीरक्षक निवडला. सर्वोत्तम कोण आहे? तुम्ही ११ पत्रकारांची निवड करण्याचा प्रयत्न केला, जो माझ्या मते योग्य नाही. सर्वात जास्त मदत करू शकणारे लोक निवडा. तुम्ही फोन केला नाही. मी तुमची यापुढे कधीही मुलाखत घेणार नाही आणि मला हे नेहमी लक्षात राहील.”

श्रीलंकेविरुद्धच्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी साहाव्यतिरिक्त अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि इशांत शर्मा यांनाही भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. पुजारा आणि रहाणे खूप काळापासून फॉर्ममध्ये नाहीत. दुसरीकडे इशांतही मागील वर्षी आपल्या जुन्या फॉर्ममध्ये दिसला नव्हता.

महत्त्वाच्या बातम्या-

वॉर्नच्या रूपात आयपीएलला मिळालेला पहिला चॅम्पियन कर्णधार, धोनीच्या सीएसकेला केले होते पराभूत

तू सर्वोत्तम ठरला! पॉंटिंगकडून वॉर्नला भावूक शब्दांत श्रद्धांजली

वॉर्नने गोलंदाजीत अनेक विक्रम केले, पण फलंदाजीतील ‘हा’ दुर्मिळ कारनामाही त्याच्याच नावावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---