भारत-ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर मालिका खेळली गेली. या मालिकेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने ही मालिका 3-1 ने जिंकली. त्याचबरोबर या पराभवानंतर भारताचे दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांची कसोटी कारकीर्द धोक्यात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आता प्रश्न असा आहे की हे दोन्ही खेळाडू कसोटी फॉरमॅटला अलविदा करणार आहेत का? भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांचे मत आहे की, दोन्ही खेळाडूंमध्ये खेळाची भूक आणि आवड आहे, त्यामुळे ते अजून कसोटी क्रिकेट खेळू शकतात.
नुकत्याच झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्राॅफी स्पर्धेत विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) चक्क फ्लॉप ठरले. त्यानंतर या दोन्ही दिग्गजांच्या कसोटी कारकिर्दीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा खराब फॉर्मला बळी पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही काळापासून दोन्ही फलंदाजांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे होत नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
ऑस्ट्रेलियाविरूद्धची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी शेवटची मालिका ठरू शकते, असे मानले जात आहे. या मालिकेत विराट कोहलीने केवळ 190 धावा केल्या. तसेच ऑफ स्टंपबाहेरील चेंडूंवर तो 8 वेळा तंबूत परतला. रोहितने या बाॅर्डर-गावसकर मालिकेत केवळ 31 धावा केल्या आहेत.
आकडेवारीनुसार विराट कोहलीने गेल्या 39 कसोटी सामन्यांमध्ये 2,028 धावा केल्या आहेत. या दरम्यान विराट कोहलीची सरासरी केवळ 30.72 आहे. त्याचबरोबर रोहित शर्मा आणि विराट कोहली देशांतर्गत क्रिकेटमध्ये न खेळण्यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वास्तविक, यामागचे तर्क क्रिकेट दिग्गजांचे म्हणणे आहे की, महान सचिन तेंडुलकरने कारकिर्दीच्या शेवटच्या दिवसांपर्यंत देशांतर्गत क्रिकेट खेळले, मग रोहित शर्मा आणि विराट कोहलीला काय अडचण आहे? जर दोन्ही दिग्गजांनी देशांतर्गत क्रिकेट खेळले असते तर कदाचित त्यांना त्यांच्या खराब फॉर्ममधून सावरण्यास मदत झाली असती.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS; विजयानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार म्हणाला, “भारतासारख्या संघाला…”
RCBसाठी आनंदाची बातमी! स्टार खेळाडूने झळकावले दमदार शतक
बाप तसा लेक! वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून वीरेंद्र सेहवागच्या मुलाचा गोलंदाजीत जलवा