मंगळवारी (दि. 21 मार्च) महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 19वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर महिला विरुद्ध मुंबई इंडियन्स महिला संघात खेळला जात आहे. या स्पर्धेत आरसीबी संघाने अत्यंत निराशाजनक प्रदर्शन केले आहे. कर्णधार स्मृती मंधाना नेतृत्वासह फलंदाजीतही अपयशी ठरली. असेच काहीसे विराट कोहली याच्याबाबतही झाले होते. विराट पहिल्या हंगामात आरसीबीचे प्रतिनिधित्व करताना फलंदाजीत अपयशी ठरला होता. या दोघांच्या पहिल्या हंगामातील कामगिरीचा आढावा आपण घेऊया…
स्मृती मंधानाची हंगामातील कामगिरी
महिला प्रीमिअर लीग 2023 (Womens Premier League 2023) स्पर्धेतील 19व्या सामन्यात मुंबई इंडियन्स महिला (Mumbai Indians Women) संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने नाणेफेक जिंकली. तसेच, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर महिला (Royal Challengers Bangalore Women) संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. यावेळी आरसीबी (RCB) संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी कर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि सोफी डिव्हाईन मैदानात उतरली होती. सोफी डावाच्या पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर शून्य धावेवर धावबाद झाली. त्यानंतर मंधानाही फार काळ टिकली नाही. तीदेखील 25 चेंडूत 24 धावा करून बाद झाली. तिने यावेळी 1 षटकार आणि 3 चौकार मारले.
Amelia Kerr gets the #RCB captain!
Smriti Mandhana departs for 24 as @mipaltan remove the openers early👌🏻👌🏻
Follow the match ▶️ https://t.co/BQoiFCRPhD#TATAWPL | #RCBvMI pic.twitter.com/5QfHJ2x8ie
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 21, 2023
स्मृतीच्या डब्ल्यूपीएल (WPL) स्पर्धेच्या पहिल्या हंगामातील कामगिरीबाबत बोलायचं झालं, तर तिने या स्पर्धेत 8 सामने खेळताना 18.62च्या सरासरीने आणि 111.9च्या स्ट्राईक रेटने 149 धावा केल्या आहेत. तिला यादरम्यान एकही अर्धशतक ठोकता आले नाहीये. तिची या हंगामातील सर्वोत्तम धावसंख्या ही 37 इतकी आहे.
विशेष म्हणजे, स्मृती डब्ल्यूपीएलच्या पहिल्या हंगामातील सर्वात महागडी खेळाडू आहे. तिला आरसीबीने 3.40 कोटी रुपये मोजत ताफ्यात सामील केले होते. मात्र, ती अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरली.
विराट कोहलीची पहिल्या हंगामातील कामगिरी
आता विराट कोहली (Virat Kohli) याच्या आयपीएलच्या पहिल्या हंगामातील कामगिरीबद्दल जाणून घेऊया. विराट हा आयपीएलच्या पहिल्या म्हणजेच 2008च्या हंगामापासून ते आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा भाग आहे. विराटने पहिल्या हंगामात आरसीबीची प्रतिनिधित्व करताना 13 सामन्यातील 12 डावात 15च्या सरासरीने आणि 105.09च्या स्ट्राईक रेटने 165 धावा केल्या होत्या. विराटलाही आयपीएलच्या पहिल्या हंगामात एकही अर्धशतक झळकावण्यात अपयश आले होते. त्याची पहिल्या हंगामातील सर्वोत्तम धावसंख्या ही 38 इतकी होती.
मात्र, त्यानंतर विराटने त्याच्या फलंदाजीत सुधारणा केली. आता तो आयपीएलमधील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत 6411 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 शतके आणि 42 अर्धशतकांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, विराटची आयपीएल 2008 (IPL 2008) हंगामातील पगार हा 12 लाख इतका होता. तसेच, आयपीएल 2023 हंगामातील पगार हा 15 कोटी आहे. (Both Virat Kohli and Smriti Mandhana have failed to score a fifty in their inaugural season for RCB)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘ही’ आहेत IPLमधील सर्वात दुर्लक्षित केले गेलेले दोन भारतीय खेळाडू, विश्वास बसणे कठीण; कुंबळेचा खुलासा
‘मोदी साहेब, प्लीज दोन्ही देशात…’, शाहिद आफ्रिदीने मोदींपुढे पसरले हात, सविस्तर बातमी वाचाच