विजय हजारे ट्रॉफी 2018-19 मधील बेंगलूरू येथे झालेल्या सामन्यात मुंबईने कर्नाटकच्या संघाचा 88 धावांनी पराभव केला. मुंबई संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने 150 चेंडूत 148 धावांची धमाकेदार खेळी केली.
मागील काही दिवसांपासून भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी झगडणाऱ्या अजिंक्य रहाणेने आपल्या खेळी दरम्यान 13 चौकार आणि 3 षटकार लगावले. त्याला सुरेख साथ देत श्रेयस अय्यरने 82 चेंडूत 110 धावांची तुफानी खेळी केली.
रहाणेने त्याचा सलामीचा जोडीदार पृथ्वी शॉच्या मदतीने 106 धावांची भागिदारी केली. शॉने 53 चेंडूत 60 धावा केल्या. त्यानंतर त्याने श्रेयस अय्यर सोबत 216 धावांची भागिदारी केली.
या खेळींच्या जोरावर मुंबईच्या संघाने कर्नाटक समोर 363 धावांचे आव्हान उभे केले. प्रत्युतरात कर्नाटकचा संपुर्ण डाव 45 षटकात 274 धावांत आटोपला.
अजिंक्य रहाणे मागील सहा महिन्यापासून भारतीय संघाबाहेर असून त्याने त्याचा शेवटचा वनडे सामना 16 फेबुरवारी 2018 दक्षिण अफ्रिका दौऱ्यात खेळला होता. त्यानंतर झालेल्या इंग्लडविरूध्दच्या वनडे मालिकेत आणि सध्या चालू असलेल्या एशिया कप स्पर्धेत त्याला संधी मिळालेली नाही.
इंग्लड विरूध्द झालेल्या कसोटी मालिकेत देखील त्याला फारशी चमकदार कामगिरी करता आली नव्हती.
विजय हजारे ट्रॉफीत मुंबईचा कर्णधार असलेल्या रहाणने हा चांगला फॉर्मात असून त्याने पहिल्याच सामन्यात 79 धावांची नाबाद खेळी केली होती. त्याच्यानंतर दुसऱ्याच सामन्यात त्याने ही कामगिरी केली आहे.
वनडे क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 90 सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यात त्याने 35.26 च्या सरासरीने 2962 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–२० वर्षीय राशिद खानचा क्रिकेट जगतातील सर्वात मोठा पराक्रम
–एशिया कप २०१८: भारताचा बांगलादेशवर मोठा विजय; कर्णधार रोहित शर्माचे शानदार अर्धशतक
–Video: धोनीच्या हुशारीने मिळवून दिली टीम इंडियाला ही महत्त्वाची विकेट
–वाढदिवस विशेष: सिक्सर किंग ख्रिस गेलबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी