---Advertisement---

व्हिडिओ: युरोपियन क्रिकेटमध्ये गोलंदाजाने केल्या दोन मोठ्या चुका; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘कोंबडी पकड’

European-Cricket
---Advertisement---

क्रिकेट हा असा खेळ आहे, ज्यामध्ये निकाल काय लागेल शेवटच्या चेंडूपर्यंत हे सांगता येत नाही. तसेच, या खेळात अनेकदा अशा काही घटना घडतात, ज्याने पाहणारा पोट धरून हसल्याशिवाय राहूच शकत नाही. गली क्रिकेटपासून ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत खेळाडू अशा काही चुका करतात, ज्यावर प्रेक्षकांना राग येत नाही, पण ते हसतात मात्र नक्की. सोशल मीडियावर असे लाखो व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होतात, ज्यांच्यावर क्रिकेट चाहते आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतात. मात्र, नुकताच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येकजण हसल्याशिवाय राहणार नाही.

नेमकं काय घडलं?
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ युरोपियन क्रिकेट (European Cricket) स्पर्धेमधील आहे. माल्टा येथील मारसा स्पोर्ट्स क्लबमध्ये मेटर डी विरुद्ध ओव्हरसीज (Mater Dei vs Overseas) संघात सामना सुरू होता. मात्र, ओव्हरसीज संघाच्या डावादरम्यान सातव्या षटकात फलंदाजाने शॉट मारला. बॅटची कड घेत चेंडू हवेत उडाला आणि गोलंदाजाच्या दिशेने गेला. एवढा सोपा झेल असूनही चेंडू गोलंदाजाकडून सुटला. मात्र, यानंतर त्याला लगेच धावबाद करण्याची संधीही मिळाली. ही संंधीदेखील गोलंदाजाने क्षेत्ररक्षण करताना गमावली. हे दृश्य इतके हसवणारे होते की, समालोचकही आपले हसू आवरू शकले नाहीत.

झेल सुटल्यानंतर आणि धावबाद न झाल्यामुळे नॉन स्ट्रायकर एंडवरून धावणारा फलंदाजही भलताच खुश झाला. समालोचकानेही या क्षणाचा भरभरून आनंद लुटला. यावेळी ते म्हणाले की, “हे होऊ नाही शकत. यापैकी सर्वात सोपे काय होते. झेल सुटणे की, धावबाद करणे? दोन्हीही, परंतु गोलंदाजाने दोन्हीही संधी गमावल्या. त्यानंतर फलंदाजांच्या चेहऱ्यावर खुशी झळकतेय.”

युरोपियन क्रिकेटनेही हा व्हिडिओ ट्वीट करत शेअर केला आहे. तसेच, त्यांनी या व्हिडिओला कॅप्शन देत लिहिले की, “नाही, फलंदाजांनी साजरा केलेला उत्साह सर्वोत्तम आहे.”

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, असे म्हटले जाते. मात्र, हे दृश्य पाहिल्यानंतर हा खेळ हसवणारा असल्याचेही सिद्ध होते. आता हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. (Bowler hilariously drops catch miss run out on same ball batter celebrates see video)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मागच्या हंगामात दिल्लीने ‘या’ खेळाडूंना बनवले करोडपती, पण पठ्ठ्यांनी दीड दमडीचीही केली नाही कामगिरी
डिविलियर्सला गली क्रिकेट खेळताना पाहिलंय का? नसेल, तर ‘हा’ व्हिडिओ एकदा पाहाच

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---