ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना शुक्रवारी (दि. 14 ऑक्टोबर) पार पडला. हा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित ठरला. मात्र, या सामन्यादरम्यान एक अशी घटना घडली, ज्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर तिसऱ्यांदा मंकडींगचा शिकार होता होता वाचला. यावेळी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क याने गोलंदाजीदरम्यान जोस बटलर याला चेतावणी दिली. बटलर यापूर्वी दोन वेळा मंकडींगने धावबाद झाला आहे.
झालं असं की, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी डावाच्या पाचव्या षटकात चेंडू टाकण्यासाठी परतताना मिशेल स्टार्क (Mitchell Starc) याने जोस बटलर (Jos Buttler) याला क्रीझमधून बाहेर न पडण्याची चेतावणी दिली नाही. यानंतर बटलरनेही स्टार्कला प्रत्युत्तर दिले. खरं तर, या सामन्यात बटलरने 41 चेंडूत नाबाद 65 धावांची खेळी साकारली. पावसामुळे या सामन्याचा निकाल लागला नाही.
https://twitter.com/SonySportsNetwk/status/1580928917652664322
जोस बटलर मंकडींग
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर हा दोन वेळा मंकडींगचा (Jos Buttler Mankading) शिकार झाला आहे. सन 2014 मध्ये त्याला पहिल्यांदा श्रीलंकन गोलंदाज सचित्र सेनानायके याने धावबाद केले होते. दुसरीकडे, आयपीएल 2019 मध्ये आर अश्विन याने बटलरला मंकडींगने धावबाद केले होते. त्यावेळी भलताच वाद पेटला होता. अनेक आजी-माजी खेळाडूंनी यावर आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी भारतीय महिला संघाची खेळाडू दिप्ती शर्मा (Deepti Sharma) हिने इंग्लंडची खेळाडू चार्ली डीन (Charlie Dean) हिला मंकडींगने बाद केले होते. या प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, आयसीसीने 1 ऑक्टोबरपासून मंकडींग हे पूर्णपणे कायदेशीर असल्याचे सांगितले. एखादा फलंदाज गोलंदाजाच्या हातातून चेंडू सुटण्यापूर्वी आपली क्रीझ सोडली, तर गोलंदाज त्याला धावबाद करू शकतो. विशेष म्हणजे, हा निर्णय यापूर्वीही लागू झाला होता. मात्र, हे सर्व खिलाडूवृत्तीच्या विरोधात असल्याचे सांगितले गेले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकापूर्वी राहुलबद्दल आली मोठी प्रतिक्रिया; दिग्गज म्हणाला, ‘तोच मारणार ऑस्ट्रेलियाचं मैदान’
दुखापत ‘या’ तिघांची पाठ काय सोडेना, आयपीएल 2022 नंतर आता यावर्षीचा टी-20 विश्वचषकही नाही खेळणार