शारजाह येथे अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान संघात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात पाकिस्तान संघाला तिसरा सामना जिंकण्यात यश आले. विशेष म्हणजे, अफगाणिस्तानने पहिल्यांदाच कोणत्याही मालिकेत पाकिस्तानला 2-1ने टी20 मालिकेत पराभवाचा धक्का दिला. मालिकेतील अखेरचा सामना सोमवारी (दि. 27 मार्च) खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने 66 धावांनी मोठा विजय साकारला.
या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. त्यांनी अफगाणिस्तानच्या फलंदाजांना घाम फोडला. विशेष म्हणजे, कर्णधार शादाब खान (Shadab Khan) याने 13 धावा खर्च करत 3 विकेट्स घेण्याची कामगिरीही केली. यापूर्वी त्याने फलंदाजी करतानाही 28 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
या सामन्यात शादाब खान याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. शादाब पाकिस्तानकडून पुरुष टी20 क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज बनला. त्याने अफगाणिस्तानच्या डावातील 12व्या षटकात उस्मान घनी याच्या रूपात आपली 100वी विकेट पूर्ण केली. त्याच्या नावावर 87 सामन्यात 21.35च्या सरासरीने 101 विकेट पूर्ण केल्या. तसेच, तो पाकिस्तानसाठी सर्वाधिक टी20 विकेट्स घेणारा गोलंदाज बनला.
🗣️ Pakistan captain @76Shadabkhan reviews the #AFGvPAK series and talks about completing 1️⃣0️⃣0️⃣ wickets in T20Is #BackTheBoysInGreen pic.twitter.com/5rgUYjkHR4
— Pakistan Cricket (@TheRealPCB) March 28, 2023
The 1️⃣0️⃣0️⃣th scalp ✅
A special feat for skipper @76Shadabkhan 🌟#AFGvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/HhmaBFYTRs
— Pakistan Cricket (@TheRealPCB) March 27, 2023
शादाब खानचे ट्वीट
दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत शादाब सहाव्या स्थानी पोहोचला. ही खास कामगिरी केल्यानंतर त्याने ट्वीट करत प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “टी20 क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेणारा पहिला पाकिस्तान पुरुष क्रिकेटपटू बनणे सन्मानाची बाब आहे. आम्ही मालिका जिंकू शकलो नाही, पण युवा भविष्यातील स्टार होतील. तसेच, पाकिस्तानचे नाव मोठे करतील.”
Alhamdulilah, It is an honour to become the first Pakistani men’s cricketer to take 100 T20I wickets. We couldn’t win the series but these youngsters will be future stars and make Pakistan proud InshAllah. #PakistanZindabad pic.twitter.com/TMbpM2Ovrq
— Shadab Khan (@76Shadabkhan) March 27, 2023
सर्वाधिक टी20 विकेट्स घेणारा सहावा खेळाडू
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदी आहे. त्याने 134 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानी बांगलादेशचा शाकिब अल हसन असून त्याने 131 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान तिसऱ्या स्थानी असून त्याच्या 129 विकेट्स आहेत. याव्यतिरिक्त चौथ्या स्थानी ईश सोधी असून त्याच्या 114 विकेट्स आहेत. तसेच, पाचव्या स्थानी श्रीलंकेचा माजी खेळाडू लसिथ मलिंगा असून त्याने 107 विकेट्स घेतल्या आहेत. (bowler shadab khan becomes first pakistani bowler to pick 100 t20i wickets)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रक्त काढणारा चेंडू! पाकिस्तानी गोलंदाजाच्या खुंखार चेंडूने फोडला फलंदाजाचा जबडा, पाहा व्हिडिओ
IPLपूर्वी हॉटेल रूमचा पासवर्ड विसरला सूर्या, ‘सुपला शॉट’ म्हणताच घडलं ‘असं’ काही; विराटचीही खास कमेंट