जगभरात अनेक तुफानी फलंदाज आहेत. मात्र, दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज एबी डिविलियर्सचे नाव या यादीत वरच्या फळीत घ्यावे लागेल. अनेक गोलंदाज डिविलियर्सला गोलंदाजी करताना घाबरत असल्याचे किस्से आपण अनेकदा ऐकले आहेत, असाच एक किस्सा पाकिस्तानच्या माजी दिग्गजाने सांगितला आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बटने एबी डिविलियर्सशी संबंधित एक धक्कादायक खुलासा केला आहे.
त्याने म्हटले आहे की, “एकदा पाकिस्तानी गोलंदाजाने एबी डिविलियर्सला यॉर्कर टाकण्यास नकार दिला कारण त्याला भीती होती की डिविलियर्स त्याच्यावर षटकार मारेल.” गोलंदाजाचे नाव न घेता सलमान बटने हा किस्सा सांगितला. यावरून एबी डिविलियर्सच्या फलंदाजीविषया गोलंदाजांमध्ये असलेली दहशत साफ दिसून येते.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा