विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला केवळ काही तासच शिल्लक राहिले आहेत. तत्पुर्वी माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेटचे जाणकारांनी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील साउथम्पटन येथे होणाऱ्या अंतिम सामन्याविषयी भविष्यवाणी केल्या आहेत. याबाबतीत आता माजी खेळाडू गौतम गंभीरने सुद्धा मौन सोडले आहे. त्याने या ऐतिहासिक सामन्यात कोणता संघ जिंकेल, हे सांगितले आहे.
क्रिकेटमध्ये आपण नेहमी सांगतो की, फलंदाजी मजबूत करा, फलंदाजी चांगली असेल तर सामना सहज जिंकता येतो. परंतु, माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचे म्हणणे आहे की, कसोटी सामना जिंकण्यासाठी गोलंदाजी भक्कम असली पाहिजे.
गंभीरने एका मिडिया हाऊसशी सोबत बोलताना सांगितले की, “मला नेहमी ही गोष्ट जाणवली आहे की, गोलंदाज संघाला नेहमी कसोटी सामने जिंकवून देऊ शकतो. एक कसोटी सामना जिंकण्यासाठी तुम्हाला विरोधी संघाचे २० गडी बाद करावेच लागतात. आणि मला असे वाटते की, भारतीय संघाकडे सध्याच्या परिस्थितीत तसे गोलंदाज आहेत जे विरोधी संघाला आपल्या गोलंदाजीने त्रास देऊ शकतात. भारतीय संघाची गोलंदाजी आक्रमक झाली असून ते कोणत्याही परिस्थितीचा सामना करतील.”
माजी फलंदाज गंभीर पुढे म्हणाला की, “एवढ्या लवकर या अंतिम सामन्यातील विजयी संघ घोषित करणे योग्य नाही. दोन्ही संघ चांगली मेहनत करत आहेत. परंतु, अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाचे पारडे जड आहे. त्यांनी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा अगोदर २ कसोटी सामने इंग्लंडविरुद्ध खेळले. त्याचा फायदा त्यांना इकडे होऊ शकतो.”
“तुम्ही कितीही आपआपसात सामने खेळले असाल तरीही त्या सरावाचा इतका उपयोग होत नाही. त्यामुळेच न्यूझीलंड संघाचा इंग्लंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटीमध्ये चांगला सराव झाला आहे. कुठलाही संघ सामना अनिर्णीत ठेवण्यासाठी खेळणार नाही. कारण हा अंतिम सामना आहे आणि केवळ एक कसोटी सामना आहे. दोन्ही संघ विजय मिळवण्यासाठी आक्रमक खेळी करतील,” असे त्याने शेवटी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिलीवहिली कसोटी चॅम्पियनशीप फत्ते करण्यासाठी कर्णधार कोहलीने बनवला ‘हा’ मास्टरप्लॅन, वाचा
कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात ‘हे’ भारतीय शिलेदार बलाढ्य न्यूझीलंडचा उडवतील धुव्वा!
दुर्दैवच म्हणावे! WTC फायनलमध्ये ‘हा’ अंपायर भारतासाठी अनलकी, यापुर्वी ४ विश्वचषकात नडलाय