---Advertisement---

आयपीएलच्या तेराव्या हंगामातील सर्व संघ, बघा कोणत्या संघाची गोलंदाजी आहे सर्वात तगडी

---Advertisement---

क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात एका संघाला त्यांचा उत्कृष्ट फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण विभाग परिपूर्ण बनवतो. संघाचा फलंदाजी, गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण या तिन्हीपैकी एकही विभाग जर कमजोर असेल, तर संघाच्या विजयात नेहमी अडथळे येतात.

इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) संघांचे उदाहरण पाहायचे झाले तर, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) हा आयपीएलमधील एकमेव असा संघ आहे, जो एकदाही आयपीएल ट्रॉफी न जिंकता सर्वाधिकवेळा आयपीएलच्या अंतिम सामन्यामध्ये खेळला आहे. आरसीबी संघात दमदार प्रदर्शन करणारे धुरंधर फलंदाज आहेत. पण, त्यांच्याकडे उत्कृष्ट गोलंदाजांची उणीव आहे. कदाचित यामुळेच आरसीबीला एकदाही विजेतेपद पटकावण्यात यश आले नाही.

पण, यावर्षीच्या आरसीबी संघात काही दमदार गोलंदाजांची भरती झाली आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. तसं तर, १९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगामातील सर्व संघांकडे एकापेक्षा एक दमदार गोलंदाज उपलब्ध असल्याचे दिसत आहे. या लेखात, यंदा आयपीएलच्या सर्व संघांपैकी कोणत्या संघाचे गोलंदाजी सर्वात मजबूत असेल, याची क्रमानुसार माहिती देण्यात आली आहे.

आयपीएल २०२०मधील सर्वात मजबूत गोलंदाजी आक्रमण असलेले संघ (Bowling Order According To The Ranking Of All Teams In IPL 2020) –

८. किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) – 

आयपीएल २०२० खेळाडू लिलावात किंग्स इलेव्हन पंजाबने अनेक दमदार खेळाडूंना आपल्या संघात सामाविष्ट केले आहे. त्यामुळे यंदा हा संघ वेगळ्याच अंदाजात असल्याचे दिसत आहे. २०१४ साली आयपीएलच्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारलेल्या या संघाला कोलकाता नाईट रायडर्सने विजयाचा स्वाद चाखू दिला नाही. पण, आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी संघात खेळाडूंची निवड करताना संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी सर्व विभागांना लक्षात घेत संघ तयार केला आहे.

वेगवान गोलंदाजीबाबत बोलायचं झालं तर, संघात मोहम्मद शमी, क्रिस जॉर्डन, हार्डस विल्जोन, शेल्डन कॉट्रेल, ईशान पोरेल, अर्शदीप सिंग आणि जिम्मी नीशम हे दमदार गोलंदाज उपलब्ध आहेत. तर, फिरकी गोलंदाजी करण्यासाठी मुजीब उर रहमान, रवि बिश्नोई, जगदीस सुचित, हरप्रीत बरार, तेजिंदर सिंग, ग्लेन मॅक्सवेल, मुरगन अश्विन, कृष्णप्पा गौतम आणि दीपक हुडा हे गोलंदाज उपलब्ध आहेत.

७. राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals) –

आयपीएलच्या पहिल्याच हंगामात विजेतेपदावर आपली मोहर लावणारा संघ म्हणजे राजस्थान राजयल्स. पहिल्या हंगामातील दमदार विजयानंतर मात्र या संघाला जास्त चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानंतर ते आयपीएलच्या एकाही हंगामात अंतिम सामन्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. पण, आयपीएलच्या तेराव्या हंगमात त्यांच्या संघाची गोलंदाजी फळी दमदार असल्याचे दिसत आहे.

संघात जोफ्रा आर्चर, ऍन्ड्रू टाय, ओशियन थॉमस, अंकित राजपूत, कार्तिक त्यागी आणि जयदेव उनाडकट हे दमदार वेगवान गोलंदाज उपलब्ध आहेत. तर, शशांक सिंग, अनिरुद्ध जोशी, रियान पराग, राहुल तेवटिया, मयंक मार्कंडेय, महीपाल लोमरार आणि श्रेयश गोपाल या दमदार फिरकीपटूंनी संघ भरलेला आहे. त्यामुळे संघ आयपीएऐल २०२०मध्ये शानदार प्रदर्शन करताना दिसेल.

६. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) –

दिल्ली कॅपिटल्स संघात कागिसो रबाडा, भारताचा अनुभवी गोलंदाज इशांत शर्मा आणि भारताकडून खेळलेला मोहित शर्मा असे दमदार वेगवान गोलंदाज उपलब्ध आहेत. या तिघांच्या उपस्थितीमुळे दिल्ली कॅपिटल्सचे वेगवान गोलंदाजी प्रदर्शन जबरदस्त राहणार असल्याचे दिसत आहे.

तर, संघातील फिरकीपटूंचेही तोड नाही. दिल्ली कॅपिटल्सकडे यंदा भारताकडून खेळलेले आर अश्विन, अमित मिश्रा आणि अक्षर पटेल हे दमदार फिरकीपटू आहेत. तर, वेस्ट इंडिजचा किमो पॉल हा वेगवान गोलंदाजीत त्याची कमाल दाखवू शकतो. शिवाय, मार्क्स स्टॉयनिस आणि हर्षल पटेल हे गोलंदाजी अष्टपैलूही दिल्ली कॅपिटल्सचा भाग आहेत.

५. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) –

विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात यंदा अनेक दमदार गोलंदाजांची भरती झाली आहे. त्यामुळे यावर्षी त्यांच्या विजयाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. संघाच्या वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी डेल स्टेन, उमेश यादव, मोहम्मद सिराज, वनदीप सैनी, शिवम दुबे, केन रिचर्डसन, क्रिस मौरिस आणि इसुरु उडाना हे दमदार गोलंदाज उपलब्ध आहेत.

तर, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुदंर, पवन नेगी आणि मोइन अली अशा फिरकीपटूंनी संघ भरलेला आहे. त्यामुळे यंदा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाची गोलंदाजीची उणिव भरुन निघणार आहे.

४. कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Night Riders) –

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२०च्या खेळाडू लिलावात आपल्या संघातील प्लेइंग इलेव्हनसोबत दमदार पर्यायी खेळाडूंचीही संघात भरती केली आहे. त्यांच्या गोलंदाजी फळीविषयी बोलायचं झालं तर, संघात पऍट कमिन्स, कमलेश नागरकोटी, प्रसिद्ध कृष्णा, लॉकी फर्ग्युसन, आंद्रे रसल, संदीप वॉरियर आणि शिवम मावी हे एकापेक्षा एक वेगवान गोलंदाज उपलब्ध आहेत.

तर, फिरकी गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी कुलदिप यादव, सुनिल नरेन, क्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ, नितीश राणा आणि वरुण चक्रवर्ती हे शानदार गोलंदाज उपलब्ध आहेत. त्यामुळे या संघाचे गोलंदाजी आक्रमक यंदा दमदार असल्याचे दिसून येत आहे.

३. सनराइजर्स हैद्राबाद (Sunrisers Hydrabad) –

सनराइजर्स हैद्राबाद हा संघ त्यांच्या दमदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. पण आयपीएल २०२०मध्येही त्यांची गोलंदाजी फळी देखील जबरदस्त असल्याचे दिसत आहे.

सनराइजर्स हैद्रबादकडे भुवनेश्वर कुमारसारखा शानदार वेगवान गोलंदाज उपलब्ध आहे, जो सामन्याच्या सुरुवातीच्या किंवा शेवटच्या षटकात दमदार गोलंदाजी प्रदर्शन करण्याची क्षमता राखतो. आयपीएलमध्ये शानदार प्रदर्शन केलेला बिली स्टेनलेकदेखील संघाचा भाग आहे. तर, सिद्धार्थ कौल आणि संदिप शर्मा हे अनुभवी वेगवान गोलंदाजही संघात आहेत. तर, खलील अहमद हा युवा वेगवान गोलंदाजही सनराइजर्स हैद्राबादकडे आहे.

राशिद खान आणि मोहम्मद नबी यांची अफघानिस्तानी फिरकीपटू जोडी सनराइजर्स हैद्राबाद संघात उपलब्ध आहे. तर, फेबियन ऐलनच्या रुपात संघामध्ये अजून एक फिरकीपटू जोडला गेला आहे. या आंतरराष्ट्रीय फिरकीपटूं शिवाय संघात भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील स्टार गोलंदाज शाहबाज नदीमदेखील उपस्थित आहे.

२. चेन्नई सुर किंग्स (Chennai Super Kings) –

आयपीएलचा दूसरा सर्वात यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्स (सीएसके)कडे यंदा दीपक चाहर आणि शार्दुल ठाकुर यांच्यासारखे वेगवान भारतीय गोलंदाज उपलब्ध आहेत. या दोन्ही गोलंदाजांनी यापुर्वीही सीएसकेकडून शानदार गोलंदाजी प्रदर्शन केले आहे. तसेच संघाकडे ‘टी२० स्पेशलिस्ट’ लुंगी एन्डिगी हा वेगवान गोलंदाजही उपलब्ध आहे. शिवाय सीएसकेमध्ये ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेजलवुडचाही समावेश करण्यात आला आहे.

फिरकीपटूंविषयी बोलायचे झाले तर, सीएसकेकडे इमरान ताहिर, हरभजन सिंग, मिचेल सेंटनर, कर्ण शर्मा आणि पियूष चावला यांच्यासारखे एकापेक्षा एक दमदार फिरकीपटू उपलब्ध आहेत. या सर्व गोलंदाजांच्या उपस्थितीमुळे यंदा सीएसकेचे गोलंदाजी आक्रमण खूप जबरदस्त असल्याचे दिसत आहे.

१. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) –

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सचे आयपीएलच्या तेराव्या हंगामातील वेगवान गोलंदाजी आक्रमण सर्वांपेक्षा जास्त मजबूत असल्याचे दिसत आहे. कारण, त्यांच्याकडे जगातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह उपलब्ध आहे. तर, लसिथ मलिंगाचा गोलंदाजीतील अनुभवही त्यांच्यासाठी उपयोगी ठरु शकतो. तसेच मुंबई इंडियन्समध्ये ट्रेंट बोल्ट हा शानदार डावखुरा वेगवान गोलंदाजही उपस्थित आहे.

या हंगामात मुंबई इंडियन्सने नाथन कुल्टर नाइलला आपल्या संघात सामाविष्ट केले आहे. तर, संघाला आपल्या गोलंदाजीने सामना जिंकून देण्याची क्षमता राखणारे पंड्या बंधूही संघाचा भाग आहेत. एवढेच नव्हे तर, गतवर्षी आयपीएलमध्ये कमालीची गोलंदाजी करणारा फिरकीपटू राहुल चहरही संघाचा भाग आहे.

 

ट्रेंडिंग लेख –

असे २ प्रसंग, जेव्हा विराट कोहलीने एका वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठोकल्या होत्या सर्वाधिक धावा

दुर्दैव! २ असे प्रसंग जेव्हा कसोटीत ५००पेक्षा जास्त धावा करुनही ‘या’ संघाला पहावे लागले होते पराभवाचे तोंड

आयपीएल २०२०: ‘या’ ३ खेळाडूंच्या जाण्याने कोलकाता नाईट रायडर्सला झेलावे लागू शकते मोठे नुकसान

महत्त्वाच्या बातम्या –

सुनील गावस्कर यांचे मोठे विधान; मलाही रोहित शर्मासारखा फलंदाज व्हायला आवडेल

बीसीसीआयने धोनीच्या निवृत्तीबाबत योग्य व्यवहार केला नाही; पाकिस्तानचा माजी खेळाडू कडाडला

आकडे सांगतात : विदेशात आयपीएलमध्ये खेळताना चालत नाही विराट कोहलीची बॅट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---