---Advertisement---

२०१०-२०१९ या दशकात केवळ ‘या’ दोन गोलंदाजांनीच केलाय हा मोठा पराक्रम!

---Advertisement---

2019 हे वर्ष संपत आले आहे. त्याबरोबर 2010 ते 2019 हे दशकही संपत आले आहे. या दशकात अनेक क्रिकेटपटूंनी अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. असाच एक विक्रम इंग्लंडचा (England) वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्राॅडने (Stuart Broad) आपल्या नावावर केला आहे.

इंग्लंडचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) दौऱ्यावर आहे. या दोन संघात सध्या पहिला कसोटी सामना पार पडत आहे. या सामन्यात खेळताना ब्रॉडने 5 विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने या दशकात कसोटीमध्ये 400 विकेट्स घेण्याचा टप्पाही पार केला आहे.

2010 ते 2019 या दशकात 400 कसोटी विकेट्स पूर्ण करणारा तो केवळ दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी असा विक्रम इंग्लंडचाच वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने केला आहे.

अँडरसनही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यात खेळत असून त्याने या सामन्यात 2 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे त्याच्या या दशकात 106 कसोटी सामन्यात 429 विकेट्स झाल्या आहेत. तर ब्रॉडने या दशकात 111 कसोटी सामन्यात 403 विकेट्स घेतल्या आहेत.

ब्रॉडने सेन्च्यूरियन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिसला (Faf du Plessis) बाद करत या दशकातील 400 वी कसोटी विकेट घेतली.

ब्रॉडने कसोटीमध्ये डिसेंबर 2007मध्ये पदार्पण केले होते. त्याने आत्तापर्यंत त्याच्या कारकिर्दीत 135 कसोटी सामन्यात 28.68 च्या सरासरीने 476 विकेट्स घेतल्य़ा आहेत.

2010-2019 या दशकात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज-

429 विकेट्स – जेम्स अँडरसन – 106 सामने

403 विकेट्स – स्टुअर्ट ब्राॅड – 111 सामने

377 विकेट्स – नॅथन लायन – 95 सामने

363 विकेट्स – रंगना हेरथ – 72 सामने

362 विकेट्स – आर अश्विन – 70 सामने

267 विकेट्स – डेल स्टेन – 59 सामने

256 विकेट्स – ट्रेंट बोल्ट – 65 सामने

255 विकेट्स – टिम साऊदी – 65 सामने

248 विकेट्स – माॅर्ने माॅर्केल – 67 सामने

240 विकेट्स – मिशेल स्टार्क – 56 सामने

238 विकेट्स – ईशांत शर्मा – 77 सामने

220 विकेट्स – व्हर्नोन फिलँडर – 61 सामने

211 विकेट्स – रविंद्र जडेजा – 48 सामने

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---