इंग्लंड विरुद्ध भारत संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना गुरुवारपासून (12 ऑगस्ट) लॉर्ड्सच्या मैदानावर सुरु होणार आहे. या सामन्यापूर्वी अनेक दिग्गज क्रिकेटपटू विविध मतं व्यत्त करत आहेत. आता ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज खेळाडू ब्रॅड हाॅगने लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लइंग इलेव्हनमध्ये एक बदलाव केला आहे.
हॉगच्या मते, पहिल्या कसोटीत चांगली फलंदाजी करणारा सलामिवीर फलंदाज केएल राहुलला लॉर्ड्स कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजाराच्या जागी खेळवले पाहिजे. याव्यतिरिक्त सलामीवीर म्हणून मयंक अगरवालला खेळवले पाहिजे.
मयंक अगरवाल पहिला कसोटी सामना खेळणार होता पण, सामना सुरू होण्याच्या एक दिवस आधी सरावादरम्यान वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा एक चेंडू त्याच्या डोक्यावर लागला होता. त्यानंतर तो पहिल्या कसोटीतून बाहेर पडला. त्यामुळे संघव्यवस्थापनाने त्याच्या जागी केएल राहुलला सलामीवीराची जबाबदारी सोपवली. राहुलने मोठ्या काळानंतर मिळालेल्या संधीचे सोने केले. त्याने पहिल्या डावात भारतीय संघासाठी 84 धावा केल्या. त्याने त्याच्या डावात 12 अप्रतिम चौकार मारले.
ब्रॅड हाॅगने त्याच्या युट्यूब चॅनलवर म्हटले की, “भारतीय संघला नाॅटींघममधील पावसामुळे पहिला सामना जिंकता आला नाही. संघ निराश आहे कारण, त्यांच्याकडे मालिकेत 1-0 अशी आघडी घेण्याची चांगली संधी होती.” हॉग आधी म्हणाला, त्याच्या हिशोबाने भारत दुसऱ्या कसोटीत त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काहीच बदल करणार नाही. पण तो असेही म्हणाला, “मला वाटते की मयंकला सलामीला फलंदाजी करायला पाठवल जाऊ शकतं. राहुलला तिसऱ्या क्रमांकावर पुजाराच्या जागी खेळवलं जाऊ शकते. त्याचे कारण हे आहे की, पुजारा सध्या चांगल्या फाॅर्मात नाही आणि त्याने मागच्या 10 डावांत एकदाही 40 पेक्षा जास्त धावा केल्या नाहीत.”
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ब्रॅड हाॅगने निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा, मयंक अगरवाल, केएल राहुल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.
महत्त्वाच्या बातम्या –
‘धोनीचं नाव नाही घेतलं, तर भारतात मला मारतील’, जेमिमाहच्या अजब उत्तराने वेधले लक्ष
लॉर्ड्स ठरणार विराटसाठी प्रेरणादायी; लवकरच झळकावणार शतक, दिग्गज इंग्लिश कर्णधाराची भविष्यवाणी,
शार्दुल ठाकूर लॉर्ड्स कसोटीतून बाहेर होताच वसीम जाफरने केलेलं ‘भन्नाट’ ट्विट होतंय तुफान व्हायरल