भारताचा वेगवान गोलंदाज मयंक यादवनं आयपीएल 2024 मध्ये पदार्पण केलं. त्याच्या पहिल्याच हंगामात त्यानं 4 सामने खेळले आणि सात विकेट्स घेतल्या. पण तो त्याच्या वेगासाठी ओळखला जातो, कारण त्यानं लखनऊकडून खेळताना 156.7 किमी प्रतितास वेगानं गोलंदाजी करून खळबळ उडवली होती. दुर्दैवानं, सततच्या दुखापतींमुळे त्याची कारकीर्द पाहिजे तशी पुढे जाऊ शकली नाही. आता ऑस्ट्रेलियन दिग्गज ब्रॅड हॉगनं मयंकसह त्या सर्व भारतीय खेळाडूंवर टीका केली आहे, जे आयपीएल करार मिळाल्यानंतर इतर कशाचाही विचार करत नाहीत.
ब्रॅड हॉगनं त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितलं की, मयंक यादव आयपीएल पातळीच्या फिटनेस पलीकडे जाऊ इच्छित नाही. त्यामुळेच तो आतापर्यंत भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवू शकला नाही. तो म्हणाला, “मयंक यादवला त्याच्या वेगामुळेच ओळख मिळाली आहे. त्याच्यासारखे आणखी काही गोलंदाज आहेत, जे सातत्यानं 145-150 च्या वेगानं गोलंदाजी करतात. माझा असा विश्वास आहे की, भारतातून तरुण वेगवान गोलंदाज उदयास येत आहेत. कधीकधी-कधीकधी त्यांची विचारसरणी फक्त वेगानं गोलंदाजी करण्याची असते. त्यांना फक्त आयपीएल करार मिळाला, तर ते समाधानी होतात.”
ब्रॅड हॉग म्हणाला, “एकदा का त्यांना आयपीएल कॉन्ट्रॅक्ट मिळाला की, त्यांना बाकीच्या सर्व गोष्टी कचरा वाटतात. क्रिकेटच्या दीर्घ फाॅरमॅटमध्ये कसे खेळायचे हे त्यांना शिकायचे नाही. त्यांच्याकडे ती चिकाटी नाही. त्यांना फक्त आयपीएल खेळायचे आहे”.
मयंक यादवला आयपीएल 2024 मध्ये लखनऊ सुपर जायंट्ससाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याला एलएसजीनं 20 लाख रुपयांना विकत घेतलं होतं. परंतु आयपीएल 2025 साठी लखनऊ सुपर जायंट्सनं 11 कोटी रुपयांना कायम राखलं.
हेही वाचा –
वरिष्ठ खेळाडूंची मनमानी चालणार नाही, बीसीसीआयनं घेतला मोठा निर्णय
रोहित शर्मा बॉर्डर-गावस्कर मालिकेदरम्यान निवृत्ती घेणार होता, यामुळे निर्णय बदलला
विराट-रोहितपेक्षा सूर्याचा वरचढ? टी20 कर्णधार म्हणून आतापर्यंतचा रिपोर्ट कार्ड लय भारी.!