---Advertisement---

टी२० विश्वचषकासाठी बड्या खेळाडूने निवडली भारताची प्लेइंग इलेव्हन, धवनला दाखवला बाहेरचा रस्ता

On: रविवार, जुलै 11, 2021 4:20 PM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) कोणतीही स्पर्धा म्हणजे क्रिकेटरसिकांसाठी पर्वणीच असते. १७ ऑक्टोबरपासून युएई आणि ओमान येथे आयसीसीच्या टी२० विश्वचषक २०२१ पर्वाचा थरार रंगणार आहे. तर १४ नोव्हेंबर रोजी अंतिम सामन्याने या विश्वचषकाची सांगता होणार आहे. टी२० विश्वचषकाला अजून ३ महिन्यांचा कालावधी शिल्लक असूनही क्रिकेट संघांनी आतापासूनच या स्पर्धेची तयारी सुरू केली आहे. नुकतेच ऑस्ट्रेलियाचे माजी फिरकीपटू ब्रॅड हॉग यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड केली आहे.

महत्त्वाचे म्हणजे, हॉग यांनी भारताच्या टी२० संघात विस्फोटक फलंदाज शिखर धवन याची निवड न करत त्यांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.

हॉग यांनी निवडलेल्या भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सलामी फलंदाजीसाठी रोहित शर्माला जागा देण्यात आली आहे. त्याचा जोडीदार म्हणून कर्णधार विराट कोहली याची निवड करण्यात आली आहे. यावरुनच स्पष्ट होते की, धवनला हॉग यांच्या संघात जागा मिळण्याची कसलीही शक्यता नाही. कारण धवन हा एक सलामीवीर फलंदाज आहे. केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातच नव्हे तर तो आयपीएलमध्येही दिल्ली कॅपिटल्स संघाकडून डावाची सुरुवात करताना दिसतो.

रोहित-विराटनंतर तिसऱ्या क्रमांकावर हॉग यांनी सूर्यकुमार यादवला आपल्या संघात घेतले आहे. तर यष्टीरक्षक केएल राहुल फलंदाजांच्या रुपात चौथ्या क्रमांकावर ठेवले आहे. त्याच्यानंतर दुसरा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी निवडले आहे.

यासंबंधी बोलताना हॉग म्हणाले की, “टी२० विश्वचषक २०२१ साठीच्या भारतीय संघात मी रोहित आणि विराटला सलामी फलंदाजीसाठी निवडेन. यावरुन मी धवनविरुद्ध जास्त कठोर निर्णय घेतल्यासारखे वाटेल. पण भारतीय संघाला मधल्या फळीत आक्रमक फलंदाजांची गरज आहे. त्यामुळेच मी विराटला सलामीसाठी पाठवू इच्छेल. अष्टपैलू हार्दिक पंड्याला सहाव्या क्रमांकावर पाठवले, तर सातव्या क्रमांकावर फिरकीपटू अष्टपैलू रविंद्र जडेजाला निवडता येईल. यामुळे खालच्या फळीपर्यंत भारतीय संघाकडे ताबडतोब फलंदाजी करणारे खेळाडू असतील.”

पंतविषयी बोलताना हॉग म्हणाले की, “मी भलेही त्याची पाचव्या क्रमांकावर निवड केली आहे. पण जर सातव्या षटकापर्यंत भारताच्या वरच्या फळीतील विकेट पडल्या तर मी त्याला वरील क्रमांकावर फलंदाजीला पाठवेल. यामुळे तो विरोधी संघाच्या फिरकीपटूंवर आक्रमण करेल आणि त्यांना दबावात आणेल.”

गोलंदाजी विभागाबद्दल ते म्हणाले, “मी कुलदीप यादव किंवा युझवेंद्र चहल यांच्यापैकी एका फिरकी गोलंदाजाला संघात घेईन. पण जर कुलदीपने श्रीलंका दौऱ्यावर चांगले प्रदर्शन केले तर त्याला संघाबाहेर ठेवणे अवघड असेल. त्यांच्याव्यतिरिक्त भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर आणि जसप्रीत बुमराह यांना वेगवान गोलंदाजी विभागात जागा देईन.”

टी२० विश्वचषक २०२१साठी ब्रॅड हॉग यांनी निवडलेली भारतीय प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव/युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह

महत्त्वाच्या बातम्या-

प्रेयसी अथियाच्या भावासोबत चिल करताना दिसला राहुल; नेटकरी म्हणे, ‘भावजी-मेहुणे एकत्र’

हेटमायरने दिग्गज ऑसी गोलंदाजाच्या चेंडूवर मारला स्कूप शॉट; चाहते म्हणाले, ‘हे राजामाणसांचे छंद’

व्वा! हरलीन देओलच्या कडक झेलची चर्चा पंतप्रधानांच्याही ऑफिसात; मोदी म्हणाले, ‘अद्भुत’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---