भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याच्यासाठी (ravichandran ashwin) २०२१ वर्ष खूपच चांगले ठरले. अश्विनने घेतलेल्या ५४ विकेट्समुळे तो २०२१ मधील कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. तसेच यावर्षी त्याने मोठ्या काळानंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही पुनरागमन केले. यावर्षी खेळल्या गेलेला टी-२० विश्वचषक आणि न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची मालिका यामध्ये त्याने चांगले प्रदर्शन केले. अश्विनच्या या प्रदर्शनाची दखल ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रॅड हॉग यांनी घेतली आहे.
ब्रॅड हॉगने रविचंद्रन अश्विनला २०२१ मधील सर्वोत्तम गोलंदाज ठरवले आहे. त्यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना हॉगने जो रुटला २०२१ चा सर्वोत्तम फलंदाज ठरवले. रुटने इंग्लंडचे नेतृत्व करताना मागच्या वर्षी एकूण १७०८ कसोटी धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये रुट सध्या तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
व्हिडिओ पाहा-
हॉग म्हणाले की, “जिंकण्यासाठी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन पहिल्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा वेगावान गोलंदाज शाहीन शाह अफ्रिदी आणि हसन अली यांच्या अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. शाहीन अफ्रिदी आणि हसन अली अनुक्रमे ४७ आणि ४१ विकेट्स घेतल्या आहेत. ते पाकिस्तानच्या गोलंदाजीचा भार उचलत आहेत, त्यामुळे तुम्ही त्या दोघांना सोडू नाही शकत.”
शाहीन शाह अफ्रिदी आणि हसन अली यांनी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये महत्वपूर्ण प्रदर्शन करून दाखवले आहे. तर अश्विनने देखील मागच्या वर्षी तिन्ही प्रकारांमध्ये चांगेल प्रदर्शन केले. मागच्या वर्षी त्याने १५.०३ च्या सरासरीने ६३ विकेट्स घेतल्या आणि वर्षाचा शेवट केला. या यादीत चौथ्या क्रमांकावर जसप्रीत बुमराह आहे, ज्याने मागच्या वर्षी खेळलेल्या १४ सामन्यांमध्ये ३७ विकेट्स घेतल्या आहेत.
टी-२० क्रिकेटमध्ये पुनरागमन करून अश्विनने अप्रतिम प्रदर्शनाने सर्वांना प्रभावित केले. अशात त्याला दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडले गेले आहे. अश्विनने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत १११ एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि यामध्ये ३२.९१ च्या सरासरीने १५० विकेट्स घेतल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
Video: शेवटच्या कसोटीपूर्वी रॅास टेलर भावुक, राष्ट्रगीत सुरू असताना अश्रू अनावर
पंतवर टीकेचा भडिमार सुरूच! गावसकर, मदललाल यांच्यानंतर ‘हा’ दिग्गज संतापला
सिडनीमध्ये स्मिथचाच बोलबाला! केलीये ‘अशी’ अचाट कामगिरी
व्हिडिओ पाहा –