नवी दिल्ली। भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर अनेक विक्रम आहेत. त्यामधील एक विक्रम म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाकडून सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम. सचिनने २०० कसोटी साामने खेळताना ४९ शतके ठोकली तसेच ४६३ वनडे सामने खेळताना त्याने ५१ शतके ठोकली. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण १०० शतके ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. आता असा प्रश्न उपस्थित होतोय की सचिनचा हा महाकाय विक्रम कोणता फलंदाज तोडू शकतो?, तर यादरम्यान ऑस्ट्रेलियाचे माजी फिरकीपटू ब्रॅड हॉग यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
हॉग (Brad Hogg) यांचा असा विश्वास आहे, की भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) दिग्गज फलंदाज सचिनचा (Sachin Tendulkar) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके ठोकण्याचा विक्रम मोडू शकतो. एका चाहत्याने हॉग यांना यूट्यूब चॅनेलवर विचारले, विराट सचिनचे विक्रम मोडू शकतो का?
या प्रश्नाचे प्रत्युत्तर देत हॉग यांनी म्हटले, “होय, नक्कीच. विराट असे करू शकतो. सचिनने जेव्हा क्रिकेटची सुरुवात केली होती, तेव्हाच्या तुलनेत फीटनेस स्तर आज खूपच चांगला आहे. त्याचबरोबर आजच्या काळात खेळाडूंना उत्कृष्ट ट्रेनरकडून खूप मदत मिळते. त्यांच्याकडे फिजिओ आणि डॉक्टर आहेत. जर कोणाला काही झाले, तर ते लगेच त्यामधून बरे होतात.”
कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या सचिनने कसोटीत १५९२१ धावा केल्या आहेत, तर वनडे क्रिकेटमध्ये त्याने १८४२६ धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त विराटबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत ७० शतके ठोकली आहेत. त्यामध्ये त्याने कसोटीत २७ शतके आणि वनडेत ४३ शतके ठोकली आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी कर्णधार रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असून त्याच्या नावावर एकूण ७१ शतके आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-रोहितचा मेहूणा म्हणतोय, विराटला फसविण्यासाठी रचला जातोय कट
-कर्णधार म्हणून धोनी पराभूत व्हावा असे मला वाटत नव्हते म्हणून मी रडलो
-८० वर्षांचा धोनी व्हिलचेअरवर असेल तरी त्याला माझ्या संघात खेळवेल