विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ तिसऱ्या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंडकडून एक डाव आणि 76 धावांनी पराभूत झाला. यासह इंग्लडने 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. दोन्ही संघांमधील चौथी कसोटी ओव्हल येथे खेळली जाईल. यापूर्वी, ऑस्ट्रेलियाचे माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगने भारतीय संघाला दोन बदल करण्याचा सल्ला दिला आहे.
हॉगने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. एका चाहत्याने हॉगला विचारले की, आर अश्विन आणि शार्दुल ठाकूर चौथ्या कसोटी सामन्यात खेळतील का?
याचे उत्तर देत हॉग म्हणाला की, “रवींद्र जडेजा चौथ्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. यामागचे कारण त्याची खराब कामगिरी नाही तर फक्त त्याच्या गुडघ्याला झालेली किरकोळ दुखापत आहे. खरे तर, जडेजाच्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे कर्णधार विराट कोहलीसह व्यवस्थापन त्याला चौथ्या कसोटीत खेळवून धोका पत्करू शकत नाही.”
चौथा कसोटी सामना 2 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. रवींद्र जडेजाची जागा आर अश्विन घेईल असे हॉगला वाटते. त्याच्या मते, अश्विन सातव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो आणि शार्दुल ठाकूर आठव्या क्रमांकावर येऊ शकतो. हे दोन्ही खेळाडू जडेजाची उणीव भरून काढू शकतात. तो म्हणाला की, “शार्दुल देखील अधिक स्विंग गोलंदाजी करू शकतो. अश्विनला चेंडूला टर्न आणि बाउंस देखील मिळू शकतो. त्यामुळे त्यांना खेळवणे हुशारीचा निर्णय असेल.”
दरम्यान, लीड्स कसोटीत इंग्लंडने भारताचा एक डाव आणि 76 धावांनी पराभव करत मालिका बरोबरीत आणली आहे. या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघ 78 धावांवर बाद झाला होता. तर दुसऱ्या डावात रोहित शर्माने 59 धावा केल्या, पुजाराने 91 धावा केल्या, तर कर्णधार विराट कोहलीने 55 धावा केल्या. चौथ्या दिवशी पुजारा आणि कोहली बाद झाले आणि त्यानंतर संपूर्ण भारतीय फलंदाजी अक्षरशः कोलमडली. भारतीय संघाला निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मध्यक्रमातील खेळाडूंच्या संघर्षात रहाणेचे अपयश दुर्लक्षित, पण आता ‘या’ शिलेदारामुळे सुट्टी पक्की?
लॉर्ड्सचा शतकवीर लीड्समध्ये फ्लॉप, फॉर्म टिकवून ठेवण्यासाठी माजी खेळाडूने दिला ‘हा’ गुरुमंत्र
संधी असूनही फलंदाजाला दिले जीवनदान अन् मारली मिठी, ब्रावोच्या खेळाडूवृत्तीने जिंकली लाखो मने