इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएलच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. जगातील सर्वात प्रसिद्ध टी20 लीगची ब्रँड व्हॅल्यू गेल्या वर्षीच्या तुलनेत 13 टक्क्यांनी वाढून तब्बल 12 अब्ज डॉलर्स (1.01 लाख कोटी रुपये) झाली आहे. 2023 मध्ये आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू 10.7 अब्ज डॉलर्स एवढी होती.
ब्रँड व्हॅल्यूएशन कंपनी ब्रँड फायनान्सच्या नवीन अहवालानुसार, प्रथमच चार आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर्स यांची ब्रँड व्हॅल्यू 100 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे. गेल्या वर्षी आयपीएलच्या ब्रँड व्हॅल्यूनं प्रथमच 10 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला होता. आयपीएल 2008 मध्ये सुरू झालं. 2009 मध्ये स्पर्धेचं मूल्य 2 अब्ज डॉलर्सच्या जवळपास होतं.
इतर संघांबद्दल बोलायचं झाल्यास, राजस्थान रॉयल्सचं ब्रँड मूल्य 30 टक्क्यांनी वाढून 81 दशलक्ष डॉलर्स झालं. तर दिल्ली कॅपिटल्सचं ब्रँड मूल्य 24 टक्क्यांनी वाढून 80 दशलक्ष डॉलर्स झालं आहे. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या नवीन फ्रँचायझींचं ब्रँड मूल्य अनुक्रमे 69 दशलक्ष डॉलर्स आणि 60 दशलक्ष डॉलर्स आहे. पंजाब किंग्जचं ब्रँड मूल्य 49 टक्क्यांनी वाढून 68 दशलक्ष डॉलर्स झालं आहे.
सर्व 10 आयपीएल संघांची ब्रँड व्हॅल्यू (डॉलर्समध्ये)
चेन्नई सुपर किंग्ज – 122 मिलियन
मुंबई इंडियन्स – 119 मिलियन
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – 117 मिलियन
कोलकाता नाईट रायडर्स – 109 मिलियन
सनरायझर्स हैदराबाद – 85 मिलियन
राजस्थान रॉयल्स – 81 मिलियन
दिल्ली कॅपिटल्स – 80 मिलियन
गुजरात टायटन्स – 69 मिलियन
पंजाब किंग्ज – 68 मिलियन
लखनऊ सुपर जायंट्स – 60 मिलियन
हेही वाचा –
ब्रेट लीचा खतरनाक चेंडू अन् कमेंटेटरचा डोळा थोडक्यात वाचला!
ॲडलेड दिवस-रात्र कसोटी भारतात किती वाजता सुरू होणार? प्रत्येक सत्राची वेळ जाणून घ्या
चॅम्पियन्स ट्रॉफीचा मार्ग मोकळा, या मैदानावर होणार भारत-पाकिस्तान सामना!






