fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

ड्वेन ब्रावोकडून टी२०त षटकारांची बरसात, केली धमाकेदार खेळी

कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये विंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोने शनिवारी (1 सप्टेंबर) त्रिनबॅगो नाईट रायडर्सकडून खेळताना सेंट किट्स अॅन्ड्स नेव्हिस पेट्रीओट्स विरुद्ध सलग पाच षटकार मारत आक्रमक खेळी केली आहे.

या सामन्यात त्रिनबॅगो नाईट रायडर्स प्रथम फलंदाजी करत होते. ब्रावोने 19 व्या षटकातील दुसऱ्या चेंडुपासून ते सहाव्या चेंडूपर्यंत सलग 5 षटकार मारले.

त्याला या षटकातील पहिल्या चेंडूवर एकही धाव करता आली नव्हती.  कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये असा पराक्रम करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. हे षटक सेंट किट्सकडून अलझारी जोसेफने टाकले होते.

ब्रावोने हे षटकार स्क्वेअर लेग, थर्ड मॅन, लाँग आॅन, डीप एक्ट्रा कव्हर अशा दिशेने मारले होते. या सामन्यात तो 17 व्या षटकात खेळायला आला होता. त्याने या सामन्यात 11 चेंडूत नाबाद 37 धावा करताना 5 षटकार आणि 1 चौकार मारला. 

तसेच त्याने कॉलिन मुन्रोची साथ देताना 5 व्या विकेटसाठी नाबाद 66 धावांची भागिदारीही रचली. मुन्रोने शेवटच्या षटकात 18 धावा करताना 50 चेंडूत नाबाद 76 धावांची खेळी केली. यात त्याने 3 चौकार आणि 5 षटकार मारले.

या दोघांच्या खेळीच्या जोरावर त्रिनबॅगोने 20 षटकात 4 बाद 199 धावा करत सेंट किट्सला 200 धावांचे आव्हान दिले.

या आव्हानाचा पाठलाग करताना  सेंट किट्सला 20 षटकात 8 बाद 153 धावाच करता आल्या. त्यामुळे त्रिनबॅगोने 46 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात सेंट किट्सकडून एविन लूइसने सर्वाधिक 52 धावा केल्या.

यावर्षीच्या सुरुवातीला इंग्लंडच्या डेव्हिड विलीनेही नॅथन लिओनच्या गोलंदाजीवर सलग 5 षटकार मारले होते. त्याने इंग्लंड विरु्दध प्राइममिनिस्टर इलेव्हन सामन्यात हा कारनामा केला होता.

तसेच जानेवारी 2016 मध्येही ख्रिस लिनने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ब्रिस्बेन हिट ब्लास्टरकडून खेळताना बेन हिल्फेनहॉसच्या गोलंदाजीवर सलग 5 षटकार मारले होते.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

वाढदिवस विशेष: वेगवान गोलंदाज इशांत शर्माबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

एशियन गेम्स: समारोप सोहळ्यासाठी हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल असणार ध्वजधारक

चौथी कसोटी: इंग्लंडचे तळातले फलंदाज ठरले टीम इंडियासाठी डोकेदुखी

You might also like