कॅरेबियन प्रीमीयर लीगच्या (सीपीएल) पहिल्याच दिवशी आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्जसाठी एक चांगली बातमी मिळाली आहे. चेन्नईचा खेळाडू आणि सीपीएलमध्ये सेंट किट्स अँड नेविस संघाचा कर्णधार ड्वेन ब्रावोने सीपीएलच्या पहिल्याच सामन्यात चांगल्या प्रदर्शनाला सुरुवात केली आहे.
त्याने सामन्यात फलंदाजी करताना ३५ चेंडूत नाबाद ४७ धावा केल्या आहेत. पण, गोलंदाजीमध्ये त्याला तशी कमाल करता आली नाही. त्याने या सामन्यात बार्बाडोस राॅयल्स विरोधात खेळताना गोलंदाजी करताना ३ षटके फोकली आणि ३७ धावा दिल्या. त्याने तीन षटकात १२.३३ च्या सरासरीने धावा दिल्या. असे असले तरी त्याचे फलंदाजीमध्ये केलेले चांगले प्रदर्शन सेंट किट्स नेविस संघासह चेन्नई सुपर किंग्जसाठीही आनंदाची गोष्ट ठरत आहे.
कोरोना संक्रमणाच्या आधी ब्रावो खराब फाॅर्म आणि फिटनेसशी झुंज देत होता. मात्र, कोरोनाच्या काळात त्याला आराम करण्यासाठी आणि त्याच्या फिटनेसवर काम करण्यासाठी खूप वेळ मिळाला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर त्याने वेस्टइंडीजच्या संघातही पुनरागमन केले आहे. आगामी काळात यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी२० विश्वचषकातही त्याचे प्रदर्शन संघासाठी महत्वाचे ठरणार आहे.
ब्रावो जेव्हा त्याच्या संघासाठी फलंदाजी फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला तेव्हा, त्याचा संघ संकटात होता. संघाची स्थिती त्यावेळी ७.१ षटकांत ३९ धावा अशी होती. संघाने त्यावेळी चार विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर ड्वेन ब्रावो आणि शेनफेन रुदरफोर्ट(५३) यांनी पाचव्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी रचली. त्यांच्या या भागीदारीच्या जोरावर सेंट किट्स नेविस संघाने १७५ धावांचा टप्पा गाठला.
त्यानंतर बार्बाडोसला २० षटकांत ७ बाद १५४ धावाच करता आल्या, त्यामुळे ब्रावोच्या सेंट किट्स अँड नेविस संघाने २१ धावांनी विजय मिळवला.
ड्वेन ब्रावोची ही दमदार खेळी पाहून यूएईत पोहचलेला चेन्नई सुपर किंग्ज संघही आनंदी असेल. कारण, ब्रावो त्यांच्या संघाचा महत्वाचा खेळाडू असून, त्याचे फॉर्ममध्ये परतणे चांगले संकेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल लवकरच बनणार भारताचा जावई, ‘या’ मुलीशी बांधणार लग्नगाठ
‘एकवेळ ४ आंतरराष्ट्रीय कर्णधार एकत्र खेळत होते,’ डू प्लेसिसने सांगितली सीएसकेची विशेषता
‘रनमशीन’ कोहलीच्या नावे ‘या’ मोठ्या विक्रमांची होऊ शकते नोंद, दिग्गजांना टाकणार मागे






