---Advertisement---

ब्रावोच ठरतोय टी२०चा खरा ‘चॅम्पियन!’ खतरनाक यॉर्कर टाकत केले फलंदाजाला गारद

On: रविवार, जून 12, 2022 6:56 PM
Dwaine-Bravo
---Advertisement---

सध्या इंग्लंडमध्ये टी२० ब्लास्ट स्पर्धा शेवटच्या टप्प्यांत आहे. या स्पर्धेत दररोज काहीना काही विशेष घटना घडते आणि ती सोशल मीडियावर धुमाकुळ घालत असते. अशीच काहीशी घटना घडली डर्बीशायर आणि वूस्टरशायर या दोन संघात झालेल्या सामन्यामध्ये. आणि या घटनेचा शिल्पकार ठरला टी२० खेळातील दिग्गज ड्वेन ब्रावो. १० जून रोजी डर्बीशायरविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ब्राव्होने आपल्या शानदार गोलंदाजीचे दर्शन घडवले, ज्याने चाहत्यांना पुन्हा एकदा वेड लावले.

सर्वांना माहित आहे की ड्वेन ब्रावो (Dwaine Bravo) हा टी२० चा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे, ब्राव्हो त्याच्या गोलंदाजीदरम्यान विविध प्रकारचे चेंडू टाकण्यात पटाईत आहे. अशा परिस्थितीत वूस्टरशायर विरुद्ध डर्बीशायर विरुद्धच्या सामन्यात ब्राव्होने त्याच्या अचूक यॉर्करवर फलंदाज ऍलेक्स ह्युजेसला (Alex Huges) त्रिफळाचीत केले.

ब्राव्होने टाकलेला हा चेंडू इतका अप्रतिम होता की दुसरा जागतिक दर्जाचा फलंदाज असता तरी त्याची फसवणूक झाली असती. असे मत व्यक्त केले जात आहे. ब्रावोने फेकलेला हा चेंडू रॉकेटसारखा होता, जो थेट फलंदाजाच्या पायाखालून जाऊन यष्टीच्या खालच्या भागावर आदळला. टी२० ब्लास्टने हा चेंडू आपल्या इंस्टाग्राम वर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘ए ट्रेडमार्क ब्रावो यॉर्कर’.

https://www.instagram.com/reel/CeonJxlLre7/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, ब्राव्होने त्याच्या घातक यॉर्करने फलंदाज ऍलेक्स ह्युजेसला त्रिफळाचीत केले. ह्युजला केवळ ९ धावा करता आल्या. तसे, या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, डर्बीशायरने हा सामना ३९ धावांनी जिंकला. प्रथम खेळताना डर्बीशायरने १६८ धावा केल्या, त्यानंतर वूस्टरशायरचा संघ २० षटकांत ९ गडी गमावून १२९ धावाच करू शकला. गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ब्राव्होला या सामन्यात केवळ २ धावा करता आल्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘त्या’ एका निर्णयाने जडेजासह मुंबई इंडियन्स आलेली गोत्यात

काय सांगता! द्रविडने फोडलेला प्रेक्षकाच्या हातातला ग्लास, पाहा व्हिडिओ

लढवय्या श्रीजेश पुन्हा बनला भारताचा तारणहार, ऑलिम्पिक चॅम्पियन बेल्जियमला चारली धूळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---